पनवेल येथे तहसील कर्मचार्‍यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

286
656
पनवेल : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 10 ऑक्टोबर पासून लक्षवेधी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. त्याला  रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने पाठिंबा देत गुरुवार (दिनांक 12 ऑक्टोबर) बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. पनवेल तहसील कार्यालयातील 36 कर्मचारी यामध्ये सहभागी झाले असून तहसीलदार आकडे यांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था केली असल्याचे सांगितले आहे.
महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करावे,नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे 4300 वरून 4800 करण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करावा,अव्वल कारकून संवर्गातील श्रेणीमधील त्रुटी दूर करणे,शिवाय संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्यासंदर्भात पुरवठा विभागातील निरीक्षक संवर्गातील पदे सरळसेवेतून न भरणे,  नायब तहसीलदारांची सरळसेवा भरतीचे प्रमाण 33 टक्केवरून 20 टक्के करून 80 टक्के मंजूर पदे मंजूर केलेली आहेत त्याचा शासननिर्णय जाहीर करणे,दांगट समितीने आकृतिबंधात सुधारणा सुचविल्याप्रमाणे शासननिर्णय जाहीर करणे,इतर विभागाच्या कामांसाठी महसूलविना कामांसाठी नवा आकृतीबंध तयार करून मंजूर करणे महसूल विभागातील अस्थायी पदे स्थायी करणे तसेच रिक्त पदे भरणे अशा विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन सुरु केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची कामे वगळता इतर कामे कर्मचार्‍यांनी बंद ठेवली आहेत.

286 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here