चेन्नई : चेन्नईच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती होऊ घातली आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी व जयललिता यांच्यानंतर कमल हसन यांच्या रूपानं दाक्षिणात्य सिनेमातील आणखी एक सुपरस्टार सक्रिय राजकारणात प्रवेश करणार आहे. कमल हसन यांनी स्वत: ही घोषणा केली असून आम आदमी पक्षाच्या धर्तीवर लोकवर्गणीतून ते स्वत:चा राजकीय पक्ष काढणार आहेत.

चेन्नईतील एका कार्यक्रमात कमल हसन यांनी ही घोषणा केली. उद्या, ७ नोव्हेंबरला कमल हसन यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवशी ते एक मोबाइल अॅप लाँच करणार असून त्याद्वारे चाहत्यांना पाठिंब्याचं आवाहन करणार आहेत. या अॅपच्या माध्यमातूनच ते पक्षनिधी उभारणार आहेत. नव्या पक्षाच्या बांधणीसाठी किमान ३० कोटी रुपयांची गरज लागेल, असं कमल हसन यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here