मुंबई : अभिनेता अक्षय कुमार त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीच काहीतरी हटके घेऊन येत असतो. त्यामुळे त्याच्या चित्रपटांबद्दल नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते. असंच काहीसं चित्र आहे ते अक्षय कुमार, सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाबाबत. या चित्रपटाचं नवं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. ‘सुपर हिरो है ये पगला, आ रहा है २६ जनवरी २०१८ को #PadMan’ असं कॅप्शन देत अक्षय कुमारनंच त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हे पोस्टर शेअर केलंय.

मासिक पाळीसारख्या महत्त्वाच्या विषयावर आजही आपल्याकडं गुप्तता पाळली जाते. मासिक पाळीदरम्यान स्त्रियांचं आरोग्य, स्वच्छता यांसारख्या विषयावर बोललेदेखील जात नाही. नेमक्या याच विषयावर अक्षयचा ‘पॅडमॅन’ भाष्य करणार आहे. खेड्यातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार करणाऱ्या कोइम्बतूर येथील अरुणाचलम मुरुगानंदम यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. त्यामुळंच या पोस्टरमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कापसाच्या ढिगाऱ्यामध्ये चित्रपटाचा नायक उभा असल्याचे दाखवण्यात आलंय. स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘लो कॉस्ट सॅनिटरी पॅड मूव्हमेंट’ ठरलेल्या सॅनिटरी नॅपकिनच्या निर्मितीची प्रेरणादायी कथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here