पनवेलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा उत्साहात साजरा

0
107
पनवेल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  १२७ व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी (दि. १४) आयोजित करण्यात आलेला जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत भाजपच्या लोकप्रतिनिधींनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास आभिवादन करून मिरवणुकीत सहभाग घेतला.
शहरात बाबासाहेबांच्या प्रतिमेची रथाद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.  मिरवणुकीत विविध चित्ररथ, ढोलताशाच्या गजरात व जयघोषात बाबासाहेबांचा जयजयकार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकॄती पुतळा येथे सकाळी पुजा पठण झाल्यानंतर अभिवादन करण्यात आले. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या भीम अनुयायांसाठी भाजपच्यावतीने थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भाजप  कार्यालयाच्यावतीने मिरवणुकीचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले.
भाजपाच्यावतीने बाबासाहेबांना अभिवादन 
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here