पनवेल तालुका व पनवेल महानगरपालिका क्षेत्र कमिटीची आढावा बैठक संपन्न

97
595

पनवेल (प्रतिनिधी)

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने काँग्रेसच्या पनवेल तालुका व पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कै. चापशी पुरुषोत्तम उर्फ शंभूशेठ खासिया, काँग्रेस भवन येथे मार्गदर्शक मा. रमेश किर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत बुथनिहाय कमिटी सह नवीन मतदार यादी व शक्ती अँप नोंदणीचा आढावा घेण्यात आला. परिस्थितीने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने पक्षाला उभारी देऊन नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावे, असे प्रतिपादन रमेश किर यांनी यावेळी केले. काँग्रेस भवनात बुधवारी झालेल्या बैठकीत पनवेल मतदारसंघात आगामी निवडणुकीत काँग्रेसची काय परिस्थिती असू शकते? या मतदारसंघातून निवडून येण्यासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता आहे ? याची चाचपणी करण्यात आली. बैठकीसाठी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत, कामगार नेते महेंद्र घरत, सुदामशेठ पाटील, महादेव कटेकर, अनंता पाटील, भक्तिकुमार दवे,  मोतिशेट बांठिया, श्रुति म्हात्रे, बाबुशेट भोईर, किसन नेरुलकर, वसंत काठवले, अरविंद सावळेकर, जनार्दन पाटील, रघुनाथ पाटील, हरपिंदर वीर, लतीफ शेख, हेमराज म्हात्रे, डॉ. धनंजय क्षीरसागर, कांतीलाल कडू, निर्मला म्हात्रे, सरिता पाटणकर, शशिकला सिंह,त्रिंबक केणी, कान्हा कडव, राहुल जानोरकर, शशिकांत बांदोडकर, कॅप्टन कलावत, जे पि खारगे, प्रेमा अपाची, अंकुश गायकवाड़, मनोज गाँधी, अभिजीत मुंदककल ,सुदेष्णा रायते, सचिन दिघे, विलास मागड़े, विश्वजीत पाटिल, जयवंत देशमुख, प्रदीप म्हात्रे, जसविंदर सैनी, रितू शर्मा, अमित दवे, बबलू सेठी, आबा लबडे, जयेश लोखंडे,राहुल सावंत संतोष चिखलक,र एम के सिंह, अजिनाथ सावंत, मर्फी म्हसकर यांच्यासह प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

97 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here