नवीमुंबई 14838 जणांना मिळणार हक्काचं घर

93
596

नवीमुंबई :

सिडकोतर्फे ‘सर्वांसाठी घरे’ धोरणाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी साकारण्यात आलेल्या महागृहनिर्माण योजनेतील 14 हजार 838 परवडणाऱ्या घरांची ऑनलाईन संगणकीय सोडत मंगळवार, दिनांक 2 ऑक्टोबर 2018 रोजी सिडको भवन, सातवा मजला, सिडको सभागृह येथे संपन्न झाली. या प्रसंगी योजनेच्या अर्जदारांनीदेखील मोठ्या प्रमाणावर हजेरी नोंदवली. सदर सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टच्या माध्यमातून सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ www.cidco.maharashtra.gov.in वरून करण्यात आले होते. या थेट प्रक्षेपणालादेखील अर्जदारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी  सिडकोचे, श्री. लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक 2, कु. प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी व श्री. निलेश चौधरी, व्यवस्थापक प्रणाली उपस्थित होते. त्याचप्रमाणे सदर सोडत पर्यवेक्षण समितीच्या देखरेखीखाली पार पडली. या समितीमध्ये निवृत्त (IAS) अधिकारी व माजी उपलोकायुक्त, महाराष्ट्र राज्य शासन, श्री. सुरेश कुमार, एनआयसी मुंबईचे श्री. मोईझ हुसेन व आयसीटी अधिकारी, म्हाडा श्रीमती. सविता बोडके यांचा समावेश होता. सोडतीसाठी वापरण्यात आलेले सॉफ्टवेअर ‘मे. प्रॉबिटी सॉफ्ट’ यांच्यामार्फत सिडकोच्या आवश्यकतेनुसार विकसित करण्यात आले होते. संगणकीय सोडत काढताना अर्जदाराच्या अर्जाचा क्रमांक हाच बीज क्रमांक म्हणून गृहित धरण्यात आला होता. प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या अर्जातून स्वतंत्रपणे योजना संकेत क्रमांक व आरक्षण प्रवर्ग क्रमांक निहाय जाहीर सोडत संगणकाद्वारे काढण्यात आली. परंतु जर प्रत्येक योजनेत अथवा प्रवर्गाकरिता उपलब्ध सदनिकांच्या संख्येपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले अथवा पहिल्या सोडतीनंतर सदनिका शिल्लक राहिल्यास ज्या अर्जदारांनी अर्ज भरतेवेळी ‘अन्य गृहनिर्माण योजनेतील रिक्त सदनिका देण्याबाबत आपला विचार व्हावा’ यासाठी संमती दिली असेल अशा अर्जदारांमधूनच सोडत काढण्यात आली. सोडत प्रसंगी अनेक भाग्यवान विजेते हजर होते. त्यांचे या प्रसंगी अभिनंदन करण्यात आले. सोडतीचा निकाल सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ www.cidco.maharashtra.gov.in व https://lottery.cidcoindia.com वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यशस्वी अर्जदारांना सिडको महामंडळातर्फे सदनिका प्राप्त झाल्यासंदर्भातील एसएमएस पाठवण्यात येणार आहेत.

 

93 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here