कालसेकर महाविद्यालयाद्वारे ‘स्वच्छ भारत अभियान’

0
423
पनवेल:
अंजुमन-ए-इस्लाम या प्रथितयश संस्थेच्या अब्दुल रझ्झाक कालसेकर पॉलिटेक्निक व कालसेकर टेक्निकल कॅम्पस, पनवेल आणि पनवेल महानगरपालिका व रोटरी क्लब पनवेल, यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पनवेल शहरात ‘स्वच्छ भारत अभियान’ संपन्न झाले.
राष्ट्रपिता म.गांधी यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जुने पनवेल येथे या अभियानाची सुरूवात केली गेली. सुमारे 100 विद्यार्थी व 50 शिक्षक तर 50 शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी या अभियानात पुढाकार घेऊन श्रमदान केले. डॉ. आंबेडकर पुतळयापासून पनवेल रेल्वे स्थानका दरम्यानचा परिसर कालसेकर महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचार्‍यांनी स्वच्छ केला.
पनवेलचे नगरसेवक श्री. राजू सोनी, नगरसेविका सौ. दर्शना भोईर, रोटरॅक्ट अध्यक्ष श्री. ए. सी. म्हात्रे व सौ. म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, , श्री. शैलेंद्र गायकवाड, पर्यवेक्षक श्री. संजय जाधव आदि मान्यवर या अभियाना दरम्यान उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शनही केले.
अंजुमन-ए-इस्लाम,  नवी मुंबई शिक्षण संस्थांचे एक्झिकेटिव्ह चेअरमन श्री. बुरहान हारिस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न या स्वच्छता अभियानास कालसेकर टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. अब्दुल रझ्झाक होनुटागी, कालसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. रमजान खाटीक, फार्मसी महाविद्यालयाचे डीन डॉ. शारीक उपस्थित होते. या स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वितेसाठी समन्वयक प्रा. अबू सुफियान, प्रा. बंदे नवाज, कालसेकर टेक्निकल कॅम्पसचे एन.एस.एस. प्रमुख डॉ. असीफ गांधी व कालसेकर पॉलिटेक्निक एन.एस.एस. प्रमुख प्रा. झहीर खतीब यांनी विशेष परिश्रम घेतले.
सुमारे 2 तास चाललेल्या श्रमदानानंतर आंबेडकर पुतळा, लक्ष्मी नगर, पनवेल रेल्वेस्टेशन आदि भागातील स्वच्छतेबाबत स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here