२६ वर्षीय इंटर्न डॉ. सुकेशा त्रिवेदी (रुग्णाबद्दलची खाजगी माहिती सुरक्षित रहावी यासाठी नाव बदलण्यात आले आहे) यांना रेक्टम कॅन्सर झाल्याचे आढळून आले.  निदान झाले तोवर कॅन्सर शेवटच्या टप्प्याला पोहोचला होता.  पोटातील इंद्रिये (पेरीटोनियम), ओव्हरीज व लिम्फ नोड्समध्ये कर्करोगाच्या पेशी सर्वत्र पसरलेल्या होत्या.  अशा परिस्थितीत केमोथेरपी हा एकमेव पारंपरिक उपचार उपलब्ध होता. पण केमोथेरपीमुळे रोग नियंत्रणात आणता आला असता मात्र त्यापासून कायमची सुटका होऊ शकली नसती.  रुग्णाला जास्तीत जास्त ६ महिने आयुष्य मिळवून देणे एवढेच शक्य होते.  सर्जिकल ऑन्कोलॉजीचे कन्सल्टन्ट डॉ. निनाद काटदरे रुग्णावर उपचार करत होते.

घटना :-  प्रायमरी पेरीटोनियल कॅन्सर दुर्मिळ असतात हे खरे पण मानवी शरीरातील जवळपास प्रत्येक ट्युमरमुळे पेरीटोनियल कॅन्सर होऊ शकतो.  असे आढळून आले आहे की, कोलोन कॅन्सर असलेल्या १०% रुग्णांना पेरीटोनियल कॅन्सर होऊ शकतो.  गॅस्ट्रिक कॅन्सर असलेल्या रुग्णांना पेरीटोनियल कॅन्सर होण्याची शक्यता ३०% असते.  हे कॅन्सर पेरीटोनियममध्ये पसरतात आणि रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता यामध्ये खूप जास्त असते.

केमोथेरपी रक्तामधून दिली जाते आणि पेरीटोनियमला फक्त २% रक्तपुरवठा होत असल्याने केमोथेरपी त्याठिकाणी पोहोचू शकत नाही.  म्हणूनच अशा केसेसमध्ये पारंपरिक आयव्ही केमोथेरपी प्रभावी ठरू शकत नाही.

एचआयपीईसी तंत्रज्ञान :

रुग्णांना एचआयपीईसी उपचार देण्याआधी पोटातील सहज दिसून येणाऱ्या सर्व रोगपेशी काढून टाकण्यासाठी डॉक्टर्स एक प्रक्रिया / सर्जरी करतात.

हीटेड इंट्रा पेरीटोनियल केमोथेरपी म्हणजेच एचआयपीईसी तंत्रज्ञानामार्फत ४१-४२ अंश सेल्सियस तपमान असलेले स्टरीलाइज्ड केमोथेरपी सोल्युशन थेट पोटातील कर्करोगाच्या पेशींपर्यंत पोहोचवले जाते.  यामध्ये उपचारांचे अधिक जास्त डोसेस देणे शक्य असते, ज्यामुळे पोटामध्ये केमोथेरपीचा प्रभाव वाढतो.  या सोल्युशनमुळे ट्युमरमध्ये केमोथेरपी औषधे अधिक जास्त प्रमाणात शोषून घेतली जातात आणि सर्जरीनंतरही पोटात राहिलेल्या मायक्रोस्कोपिक कर्करोग पेशींचा नायनाट केला जातो.

जानेवारी महिन्यात रिलायन्स हॉस्पिटलने नवी मुंबईतील पहिली यशस्वी एचआयपीईसी केमोथेरपी पार पाडली.  यानंतर पुढील दोन महिन्यात चार यशस्वी एचआयपीईसीज करण्यात आल्या.  रिलायन्स हॉस्पिटलने  नवी मुंबईत एचआयपीईसी तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढाकार घेऊन महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.  रिलायन्स हॉस्पिटल हे भारतातील पेरीटोनियल ऑन्कोलॉजीचे सर्वाधिक व्यापक, सर्वसमावेशक केंद्र बनले आहे.  डॉ. निनाद काटदरे व त्यांची टीम रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सर्व इंट्रा-पेरीटोनियल थेरपीज (एचआयपीईसी, पीआयपीएसी, एनआयपीएस, एनआयपीईसी-एलटी व आरआयपीईसी) यशस्वीपणे करत आहेत.

डॉ. निनाद काटदरे यांनी सांगितले की, या प्रकरणातून असे ठळकपणे दिसून आले कीकर्करोग तरुण वयातही होऊ शकतो आणि याच्या कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  सायटोरीडक्टिव्ह सर्जरी व एचआयपीईसी यामुळे योग्यरीत्या निवडण्यात आलेले पेरीटोनियल कॅन्सर रुग्ण बरे होण्याची शक्यता निर्माण होते.”

रिलायन्स हॉस्पिटल हे एकमेव असे हॉस्पिटल आहे ज्याठिकाणी पेरीटोनियल कर्करोगावरील उपचारांसाठी एक संपूर्ण टीम कार्यरत आहे.

  • कॅन्सर सर्जन, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट

  • विशेष ऑन्कॉपॅथॉलॉजिस्ट व ऑन्कॉरेडिओलॉजिस्ट

  • पेरीटोनिअल ऑन्कोलॉजीसाठी विशेष ऍनेस्थेशिया व इंटेन्सिव्ह केअर टीम

  • अशाप्रकारच्या मोठ्या सर्जरीसाठी रक्त व इतर रक्तपेशी वेळेवर योग्य प्रमाणात उपलब्ध करवून देण्यासाठी विशेष हेमॅटॉलॉजिस्ट

  • टीमच्या विविध सदस्यांदरम्यान समन्वयासाठी तसेच रुग्णाला आवश्यक मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी विशेष नर्स कोऑर्डिनेटर