आघाडीत बिघाडी उरण, पेण पाठोपाठ अलिबागमध्ये श्रद्धा ठाकूर यांना उमेदवारी जाहीर

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे. तिसऱ्या यादीमध्ये एकूण 20 उमेदवारांचा समावेश असून, या यादीत काँग्रेसने काही विद्यमान आमदारांसह काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत दीपक अत्राम (अहेरी), रवी राज देशमुख ( परभणी), अस्लम शेख (मालाड, पश्चिम), मधुकर चव्हाण (भायखळा), मनीषा सूर्यवंशी (घाटकोपर पश्चिम),  सिद्धराम मेहेत्रे (अक्कलकोट), प्रभाकर पालोडकर (सिल्लोड), मोहन सिंह (नंदुरबार), चंद्रकांत जाधव (कोल्हापूर उत्तर), बंटी शेळके ( मध्य नागपूर),  पुरुषोत्तम हजारे (पूर्व नागपूर) यांचा समावेश आहे. मात्र मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्यासाठी दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मात्र काँग्रेसने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही.