उरण विधासभा मतदार संघात 10 उमेदवारांचे अर्ज वैध

0
903

उरण :
विधानसभा मतदार संघामध्ये प्राप्त 10 नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली असता 10 उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत.
नामनिर्देशन पत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे
अतुल परशुराम भगत,मनोहर गजानन भोईर,संतोष मधुकर पाटील, अड.राकेश नारायण पाटील,विवेकानंद शंकर पाटील,कौशिक छोटालाल शहा उर्फ शाह, प्रवीण नरेश म्हात्रे, मधुकर सुदाम कडू, महेश रतनलाल बालदी व संतोष शंकर भगत अशी आहेत. अपक्ष उमेदवार महेश रतनलाल बालदी यांच्या उमेदवारीच्या नामनिर्देशन पत्रात शपथ पत्रातील वादग्रस्त दायित्वे व उसन्या दिलेल्या रकमा हे दोन रकाने निरंक भरलेले असून, ते चुकीचे भरलेले आहेत व आवश्यक ती माहिती भरलेली नाही. याबाबत शेकापचे उमेदवार विवेकानंद शंकर पाटील यांनी हरकत दाखल केली होती. मात्र सदर हरकती बाबत 190 – उरण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आश्विनी पाटील यांनी घेतलेल्या सुनावणीत विवेकानंद पाटील यांची हरकत फेटाळण्यात आली असल्याची माहिती आश्विनी पाटील यांनी दिली. त्यामुळे उरण विधानसभा मतदार संघात काल छाननी नंतर 10 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here