पनवेल :

भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आउटरिच ब्यूरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड आणि स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या सयुक्त विद्यमानाने  दि.5/10/2019 रोजी डॉ. विजय सूर्यवंशी- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, रायगड, वैशाली माने – उपजिल्हाधिकारी निवडणूक, सुनिल जाधव – नोडल अधिकारी स्वीप समिती तथा जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच दत्तात्रेय नवले – उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी 188 पनवेल विधानसभा मतदार संघ,अमित सानप – तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी,पनवेल यांच्या सहकार्याने पनवेल तालुक्यात तहसीलदार कार्यालय, पनवेल येथून हिरवा झेंडा दाखवून नालंद गांगुर्डे-निवासी नायब तहसीलदार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. “विधानसभा  निवडणूक मतदान जनजागृती अभियान” या विषयावर चित्ररथफिरवून स्वयंसिध्दा संस्थेच्या कलाकारांनी   पथनाट्यातून मतदार जनजागृती केली. यावेळी या कार्यक्रमास मतदार डिस्ट्रिक्ट युथ आयकॉन तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी गोंधळी, वायचळे – स्वीप पथक प्रमुख, मंगेश जाधव -सहाय्यक शिक्षक, नाणेकर – सहाय्यक शिक्षक, जयराम पादीर -लिपिक म.न.पा., गावंडे -लिपिक म.न.पा,महेश भापकर -लिपिक  यांसह अन्य मान्यवर व बहुसंख्य जनसमुदाय उपस्थित होता. सदर पथनाट्याचे नेतृत्व स्वयंसिध्दा संस्थेच्या अध्यक्षा सुचिता साळवी करित असून सुचिता साळवी यांनी  रिजनल आऊटरिच ब्यूरो, गीत व नाटक विभाग, महाराष्ट्र व गोवा, भारत निवडणूक आयोग अंतर्गत 20 जिल्ह्यांमध्ये मतदानाचा टक्का कमी असणाऱ्या 120 तालुक्यामध्ये चित्ररथाच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती दिली. सदर पथनाट्य दौऱ्यामध्ये कलाकार म्हूणन प्रतिक कोळी, प्रतिक पाटील, विनोद नाईक, सौरभ मोरे, अमृता शेडगे, प्रांजली पाटील, प्रतीक्षा शिपाई, स्वप्नाली थळे आदी कलाकार सहभागी झाले. चित्ररथाच्या माध्यमातून पनवेल मधील तहसील कार्यालय, शिवाजी महाराज चौक, सोसायटी नका पनवेल, रेल्वे स्टेशन, कोहिनुर टेक्निकल, डॉ. आंबेडकर भवन शेजारी, टेम्बोले नाका, शिवा कॉम्प्लेक्स न्यू पनवेल, बस स्टॅन्ड, खांदा कॉलनी, कामोठे आशा विविध ठिकाणी जनजागृती केली असून सदर कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here