पनवेल : भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ आज(रविवार, दि. १३)  कळंबोलीमध्ये बाईक रॅली झाली. या रॅलीत मावळचे लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, भाजप कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, नगरसेवक अमर पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.