थोर समाजसुधारक तीर्थरूप पद्मश्री मा. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची सदिच्छा भेट घेऊन विजयाची हॅट्रीक करणारे आमदार प्रशांत ठाकूर व नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांनी आशिर्वाद घेतले. यावेळी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी या दोन्ही आमदारांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करून त्यांचा सत्कार केला. यावेळी सचिनदादा धर्माधिकारी, स्थायी समितीचे सभापती प्रविण पाटील, माजी सभापती व विद्यमान नगरसेवक अमर पाटील आदी उपस्थित होते.