पनवेल :

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या साथीने पनवेल परिसरातील पत्रकारांनी दिवाळी फराळ करून एक आगळीवेगळी परंपरा जोपासली.
नेहमीच महानगरपालिका प्रशासन व पत्रकार यांच्यामध्ये विविध विषयावरुन साधक-बाधक चर्चा होत असतात. तर कधी कधी राग रुसवे सुद्धा होतात. हे सर्व त्या-त्या व्यक्तीच्या कामानिमित्त असते. जो तो आपापल्याकडे असलेली जबाबदारी पार पाडत असतो. त्यामुळे कधी कधी नकळत गैरसमज घडत असतात. हे सर्व विसरुन जावून महापालिका प्रशासन व पत्रकारांनी एकत्रित येवून पनवेलच्या विकासाबद्दल एक योग्य दिशा ठेवून काम करण्याच्या उद्देशाने व दिवाळी शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने आयुक्त गणेश देशमुख यांनी महानगरपालिकेच्या सभागृहात पत्रकारांसह दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग तसेच पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार, गणेश कोळी, संजय कदम, अरविंद पोतदार, भालचंद्र जुमलेदार, राजेश डांगळे, विक्रम बाबर, नितीन देशमुख, कुणाल लोंढे, दिपक घरत, वैभव गायकर, प्रशांत शेडगे, विशाल सावंत, निलेश सोनावणे, रवींद्र गायकवाड, मयुर तांबडे, सुमंत नलावडे, अविनाश जगदाने, मनोज भिंगार्डे, संतोष वाव्हळ आदींसह इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिवाळी फराळ साथीने पनवेलच्या विकासासंदर्भात सर्वांनी साधक बाधक चर्चा करून आपापली मते व्यक्त केली व एकमेकांस शुभेच्छा दिल्या.