तळा :

राज्यात अनेक भागात परतीच्या पावसाने शेतकरयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असुन हाताशी आलेले पिक उद्धवस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे शेतकरयांना मदत मिळावी म्हणुन राज्यात विविध नवनिर्वाचित आमदार आप-आपल्या मदतार संघात दौरे करताना पहायला मिळत आहे.श्रीवर्धन मतदारसंघातील नवनिर्वाचित आ.अदिती तटकरे यांनी देखील तळा तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची तपासणी शासकीय अधिकारी यांना सोबत घेऊन केली व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे मागणी सुध्दा आ.अदिती तटकरे यांच्याकडुन करण्यात आली राज्यात सत्तासंघर्षाचे राजकारण सुरु असताना दुसरीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे पहायला मिळत आहे परतीच्या पावसाने रायगडात विशेष करुन भात पिकांचे लाखो रुपयांचे अतोनात नुकसान केले आहे शेतात पाणी तुंबल्याने भाताच्या  पीकाला कोंब फुटले त्यामुळे अडचणीय आलेल्या शेतकरयांना धीर देण्यासाठी नवनिर्वाचित आ.अदिती तटकरे यांनी शेताच्या बांधावर जाऊन अधिकरयांसोबत पाहणी केली. पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे आ.अदिती तटकरे शेतकरयांच्या मदतीला धावुन येत असल्याने एकीकडे राज्यात सुरु असलेला सत्ता संघर्ष पाहता सरकार स्थापनेपुर्वी शेतकरयांना मदत मिळणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे मात्र अदितीताई तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेट्यामुळे प्रशासकी अधिकारयांनी नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरवात केली असल्याने शेतकरयांना दिलासा मिळाला आहे.या पाहणी दौरयात तालुका कृषी अधिकारी नितीन करंजे मंडळ अधिकारी श्री.वाडकर,नगरसेवक चंद्रकांत रोडे,उत्तम जाधव,नागेश लोखंडे,विजय तांबे,शैलेश घोलप,आणि शेतकरी उपस्थित होते.