पनवेल :

कोकण एज्युकेशन सोसायटी चे विठोबा खंडाप्पा हायस्कुल चे यंदाचे शतक महोत्सवी वर्ष. व्ही के नावाने प्रचलित या शाळेच्या शतक महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने हजारो माजी विद्यार्थी एकत्र येण्याचे साठी गेले अनेक महिने नियोजन करत आहेत. कित्येक वर्षांनी आपल्या मित्रांना भेटण्याची उत्सुकता माजी विद्यार्थ्यांच्यात लागून राहिली आहे. शाळेचे चेअर मन आमदार बाळाराम पाटील यांनी ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत २८ आणि २९ डिसेंबर २०१९ रोजी शतक महोत्सवाचा शानदार सोहळा संपन्न होणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या नियोजनाच्या बाबत बोलताना आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले कि, राज्याच्या आणि देशाच्या विविध कोपऱ्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांना या सोहळयात आमंत्रित करणे सुलभ जावे या उद्देशाने आम्ही वेब पेज च्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. या पेजवरील लिंक वापरून माजी विद्यार्थी त्यांचे नोंदणी शुल्क थेट संस्थेच्या खात्यावर जमा करू शकेल.माजी विद्यार्थ्यांना २० डिसेंबर पर्यंत रु एक हजार इतके नोंदणी शुल्क असेल तर त्या नंतर रु पंधराशे इतके नोंदणी शुल्क राहणार आहे. या सोहळ्यासाठी ऐच्छिक स्वरूपात मानद नोंदणी देखील करता येईल त्यासाठी रु अकरा हजार इतके नोंदणी शुल्क असेल. साधारण पणे पाच हजार माजी विद्यार्थी या निमित्ताने एकत्र येतील अशी अपेक्षा आहे.
आमदार बाळाराम पाटील पुढे म्हणाले कि, या शतक महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने शाळेसाठी नवीन इमारत व २२०० स्क्वेअर फूट चे भव्य सभागृह बांधण्याचा आमचा मानस आहे. सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी या इमारतीच्या उभारणीमध्ये हातभार लावल्यास हि इमारत झपाट्याने उभी राहण्यास मदत होईल. माजी विद्यार्थ्यांनी https://www.allaboutcity.in/blog/vk-ex-student-registration/ या वेब पेज वर जाऊन आपले रजिष्ट्रेशन करावे. या वेब पेज वर कार्यक्रमाची रूपरेषा,संपर्क क्रमांक, तसेच नोंदणी शुल्क भरण्याची लिंक,स्मरणिकेची माहिती अशा अनेक सुविधा उपलब्ध असणार आहेत. शतक महोत्सवाच्या नियोजनाचे कामी पार पडलेल्या बैठकीत शाळेचे माजी विद्यार्थी असणारे डॉ गिरीश गुणे, मंगेश परुळेकर,ऍड जगदीश घरत,मंदार नाडगौंडी,संतोष घोडींदे,गणेश कडू,दीपक मानकामे आदींनी आवर्जून उपस्थित राहत मोलाचे मार्गदर्शन केले.

नियोज़नाची बैठक बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता माजी विद्यार्थ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आमदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या बैठकीमध्ये माजी विद्यार्थी त्यांच्या सूचना मांडू शकतात,अथवा विविध समित्यांवर काम करण्यास उत्सुक असल्यास आपापला सहभाग नोंदवू शकतात. हि बैठक व्ही के हायस्कुलच्या सभागृहात संपन्न होणार आहे.