खालापूर :

आज सकाळी पहाटे 5  वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे मार्गावरील खोपोली शहराजवळील बोरघाटात खाजगी बसच्या चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बसला भीषणअपघात झाला. या अपघातात एक तीन  वर्षाच्या लहान मुलासह एकूण ५ जण ठार झाले आहेत, तर सुमारे ३० प्रवाशी जखमी आहेत.जखमींना उपचारासाठी तात्काळ खोपोली नगर पालिका,एमजीएम पनवेल व तळेगाव येथील पवना हाँस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. सदरची बस कराड येथून मुंबई कडे एकूण ४९ प्रवासी घेऊन जात होती.या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी आहे की,कराड येथून प्रवाश्यांना घेऊन खाजगी बस क्रमांक एम.एच.४/एफ.के/१५९९ मुंबईला निघाली होती.सदरची बस ही लोणावळा घाट उतरण्याच्या शेवटच्या टप्प्यात होती.यावेळी पहाटेचे 5 वाजण्याची वेळ होती.ही बस बोरघाटातील गारमाळ पॉईंट जवळ आली असतांना एका वळणावर बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला एका खोल खड्यात जावून पडली.सदरची बस ही तिव्र उतारावरुन खाली आल्याने ती केबीनवरच पडल्याने झोपेत असलेले सर्व प्रवासी बसच्या पुढच्या बाजूकडे फेकले गेल्याने यातील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित सर्व प्रवासी गंभीर तर किरकोळ जखमी झाले आहेत. सदरच्या घटनेची माहिती खोपोली पोलीसांना मिळताच खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते वाहतूक पोलीस सपोनि श्री.माने, पोहवा/२०६९ शिंदे, पोहवा / २०५५ लोहार,पोना/७६२ कोंडे,पोना/१०१० झावरे,पोना/११७३ म्हात्रे, पोना/१४१९ ठाकूर, पोना/१४८२ पाटील,पो हवालदार घुले  तसेच देवदुत, फायर ब्रिगेड, राज्य रस्ते सुरक्षा पथक ,अपघातग्रस्त ग्रुपचे सदस्य अमोल कदम ,अमित गुजर ,बंटी काबळे, यांच्या मदतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमधील जखमी प्रवाशांना बस मधून बाहेर काढून त्यांना रूग्णवाहीका मधून पवना, लोकमान्य निगडी,पुणे व एमजीएम कामोठे, खोपोली इ. हॉस्पिटलमध्येरवाना केले. अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात भांदवी कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८ मो.वा.का.१८४ प्रमाणे करण्यात आली आहे.