पनवेल : राज्यातील वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी एका चिमुकलीने सायकल प्रवास सुरू केला आहे. आई एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळा ते बालकुम असा १२० किमी प्रवास करणारी ही चिमुकली नुकतीच पनवेलमध्ये पोहोचली आणि तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सई ठाकूर (८) असे या चिमुकलीचे नाव आहे.  यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेविका चारुशीला घरत यांनी सईला पुष्पगुच्छ देत तिच्या अभिनव उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रत्येकाची प्रवास करण्यामागची कारणे वेगवेगळी असतात मात्र, एखाद्या ध्येयाने पछाडून प्रवासाला निघणारे विरळेच असतात. अशीच ठाण्यातली सई ठाकूर ही ध्येयवेडी चिमुकली. २१व्या शतकातही आपल्या समाजात मुलगा-मुलगी हा भेद दिसून येतो. मात्र, समाजातील ही मानसिकता बदलण्याचे आव्हान या मुलीने स्वीकारले आहे. स्त्री भ्रूण हत्येविरोधात जनजागृतीकरता सईने एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळापासून आपला प्रवास सुरू केला आहे. ती सायकलवरून अनेक गावांना भेट देत गावकऱ्यांमध्ये भ्रूण हत्येविरोधात जनजागृती करत आहे. अवघ्या ८ वर्षाच्या सईचे तिच्या या उपक्रमाबाबत सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. चौकट – २१व्या शतकातही आपल्या समाजात मुलगा-मुलगी हा भेद दिसून येतो. मात्र, समाजातील ही मानसिकता बदलण्याचे आव्हान या आठ वर्षाच्या मुलीने स्वीकारले आहे. या जनजागृतीकरता सईने एकवीरा देवीच्या कार्ला लोणावळापासून आपला प्रवास सुरू केला. ती सायकलवरून अनेक गावांना भेट देत गावकऱ्यांमध्ये भ्रूण हत्येविरोधात जनजागृती करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here