पेण :
   पेण तालुक्यातील डोलवी येथील जे.एस.डब्लू. कंपनीच्या सेंटर टू ऑपरेशन प्लांटमध्ये आग लागून कर्मचारी भाजल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरत साहू (छत्तीसगड) असे मयत कर्मचाऱ्यांचे नाव आहे. जखमी मध्ये एक कर्मचारी स्थानिक   असून दुसरा कर्मचारी हा मध्य प्रदेश चा रहिवासी आहे. दोन्ही कामगार गंभीर आहेत. या अपघाताला कंपनी प्रशासनाने दुजोरा दिला आहे.   बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भरत साहू, परेश आणि आणखी एक कर्मचारी सेंटर टू ऑपरेशन प्लांटमध्ये मटेरियल मिक्सरमध्ये टाकण्याचे काम करत होते. त्यावेळी अचानक आग लागून मोठा भडका उडाला. यात भरत साहू जागीच ठार झाला आहे.  या अपघाताची माहिती मिळताच जेएसडब्लू कंपनीच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. गंभीर भाजलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना ऐरोली येथील बर्निंग सेंटर रुग्णालयात हलवले आहे.