पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाल्यास माथेरान प्रगतिपथावर

0
117

माथेरान :
माथेरान हे प्रदूषण विरहित पर्यटनस्थळ अशी ओळख असलेले भारतातील एकमेव पर्यटनस्थळ आहे जेथे कोणत्याही इंधनावर चालणाऱ्या वाहनांना सरसकट बंदी आहे त्यामुळे येथे निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावणारा निसर्ग वेगवेगळ्या स्वरूपात आढळतो,आधुनिकीकरणाच्या जगात काहीसे दुर्लक्षित झालेले हे पर्यटनस्थळ आपल्या जैवविविधतेमुळे कात टाकत असून प्रदूषणविरहित पर्यावरणावर भर देत अनेक नावीन्यपूर्ण योजनांच्या आधारामुळे माथेरान आजही आपले वेगळेपण सिध्य करीत आहे. दगडमातीचे रस्ते,सह्याद्रीचे डोंगररांगा,मर्कट लीला, घोडेस्वारी व मिनीट्रेन सफरी आणि कुठेही न आढळणारी मानवी हात रिक्षा हेच माथेरानचे पारंपरिक पर्यटन होते पण माथेरानमधील काही होतकरू नगरपालिकेत प्रतिनिधी म्हणून निवडून गेल्यावर खऱ्या अर्थाने माथेरानच्या विकासाला सुरवात झाली माथेरान नगरपालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्याचा मान मिळविला हा प्रकल्प आजही सुरळीत सुरु आहे ह्या प्रकल्पामुळे माथेरानमधील मुख्य रस्त्यांवरील पथदिवे सुरु असतात ज्यामुळे पालीकेचे लाखो रुपयांची बचत झाली आहे. तर स्वतःची अवकाश निरीक्षण केंद्र असलेली नगरपालिका हा बहुमान पटकवणारी नागरपालिकाही माथेरानच ठरलेली आहे ज्यामुळे माथेरानकडे अनेक खगोलप्रेमींची पावले वळलेली आहेत माथेरानमधील शालेय विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ नेहमीच होत आहे तर येथील पेमास्टर पार्क येथे फुलपाखरू निर्मिती प्रकल्पही सुरु आहे . शासकीय निर्णय प्रक्रियेला वेळ होत असला तरी आज माथेरान कात टाकत आहे येथील स्थानिकांनी माथेरानच्या पर्यटन विकासासाठी आपली विचार सरणी बदलली असून नवीन गोष्टी अंगकारित आहे त्यामुळेच एम एम आर डी च्या मार्फत माथेरानमधील विविध प्रेक्षणीय स्थळांवर सुशोभीकरण,नेरळ माथेरान घाट रस्ता नूतनीकरण,मुख्य रस्ताचे धूळविरहित करण्याचे कामास हि सुरवात झालेली आहे त्यामुळे आगामी काळात माथेरान हे पर्यटनाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित व वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे माथेरानच्या पर्यटन विकासासाठी येथे प्रस्तावित असलेला रोप वे प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. आशिया खंडातील सर्वात लांब रोप वे असे ह्या प्रकल्पाचे वेध आतापासूनच पर्यटकांना लागले असून हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर माथेरानचे नाव हे जागतिक दर्जाच्या नकाशावर अग्रेसर असणार आहे. माथेरानमधील स्थानिकांनीही येथील वनसंपदा जपताना येथील वैशिष्ट्ये जपली आहेत.त्यामुळे येथील चामड्याच्या वस्तू व चिक्की आजही आपला दर्जा राखून पर्यटकांच्या दिमतीस आहे तर येथे प्रस्तावित असलेला ई रिक्षा ची मागणी मान्य झाल्यास माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटनाला दिलासा मिळणार आहे ,जेष्ठ नागरिक,अपंग पर्यटक व इतर पर्यटकांना स्वतःतील माथेरान पर्यटनाचा लाभ ई रिक्षांमुळे मिळणार असल्याने सर्व माथेरानकरांचा त्यास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.येणारा काळ हा माथेरानकरांच्या दृष्टीने महत्वाचा असून प्रस्तावित प्रकल्पना शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास माथेरान हे निश्चितच पर्यटनाच्या दृष्टीने उभारी घेणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here