शेकाप चे ज्येष्ठ नेते महादेवशेठ बाळशेठ पाटील यांच्या ८१ व्या जन्मदिनाच्या निमीत्ताने विविध विकासकामांच्या माध्यमातून जनसेवा करत एक अभूतपूर्व अभिष्टचिंतन सोहळा पंचक्रोशीला अनुभवायला मिळाला . तसेच पुस्तक तुला आणि पेढे तुला करून शाळकरी मुलांना त्यांचे वाटप करण्यात आले. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या गोडव्याने अभीष्टचिंतनाचे उत्साही कारंजे फुलले होते. शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी जेष्ठ शेकाप नेते महादेव शेठ पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध विकास कामांची लोकार्पणे करण्यात आली. साई नगर वहाळ येथे २ हायमास्क चे लोकार्पण, स्वर्गीय बाळकृष्ण काशिनाथ घरत उर्फ बा का शेठ स्वागत कमान व स्वर्गीय पी सी कॅप्टन स्वागत कमानींचे लोकार्पण, वहाळ स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाच्या कामाचा प्रारंभ, विद्यार्थी बस थांब्याचे उदघाटन, मोरावे येथील स्वागत कमानीचे उदघाटन, मोरावे जेट्टी व लांगेश्वर मंदिराच्या जवळील हायमास्क चे लोकार्पण, मोरावे येथील जि प शाळेतील मुलांच्या खेळण्यांचे उदघाटन, बामण डोंगरी येथे मच्छिमार बांधवांच्या साठी मच्छी विक्री ओट्याचे वाटप, क्लोज सर्किट कॅमेऱ्याचे लोकार्पण असे लोकाभिमुख कार्यक्रम करण्यात आले. अभिष्टचिंतन कार्यक्रमाला मा आमदार विवेक पाटील यांनी आवर्जून उपस्थित राहत महादेवशेठ यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमांना महादेवशेठ पाटील यांच्या समवेत ज्येष्ठ शेकाप नेते विश्वनाथ शेठ पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, ज्येष्ठ शेकाप नेते पांडू मामा घरत,रा जि प सदस्य रविंद्र पाटील, कर्नाळा स्पोर्ट्स ऍकेडमी चे उपाध्यक्ष रवीशेठ पाटील, मा तालुका चिटणीस नारायणशेठ घरत रामदास नाईक, सुरेश पाटील, सरपंच पूजा समिर पाटील, संजय नाईक ,आत्माराम शेठ पाटील, उदय खोत, सिडको कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश तांडेल, एन आर आय पोलीस स्टेशन चे व पो नि तन्वीर शेख, मो का मढवी गुरुजी, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव भारत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सदस्य ,प म पा चे नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.