सुधागड-पाली : ‘महावितरण’ने सुधागडासह पाली शहरातील रस्त्याच्या कडेला उभारलेल्या बहुतांश विद्युत खांबाना वेलींनी वेढल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे विजेच्या लोखंडी खांबांमध्ये वीजप्रवाह उतरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

पाली शहरात बहुतांश ठिकाणी विद्युत खांब रस्त्याच्या कडेला उभे  आहेत. त्या खांबांना वेळीचाचा विळखा बसला असून  महावितरण अधिकारी मात्र  याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या सुधागड पाली येथे दिसत आहे. वाकण-पाली-खोपोली महामार्गालगत वरदविनायक अपार्टमेंट या इमारती समोरील विद्युत खांबांला वेळीचा विलखा बसला पुर्ण खांब वेळीने ढाकले गेले आहे. या विद्युत खांबावरुन असणाऱ्या उच्चदाब वाहिनीमुळे धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आपघात घडण्याची ही शक्यता नाकारता येऊ शकत  नाही.

याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. पाली शहरात शहरातील विद्यूत खांबा  पाहणी केल्यानंतर स्पष्ट होत आहे.या विषयी अनेक वेळा  वर्तमानपत्रात बातम्या छापुन आल्या असुन तसेच वारंवार तक्रार केले असुन  आज हि  परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे महावितरण या गंभीर बाबीकडे केव्हा लक्ष देणार  एखाद्या अपघाताची महावितरण वाट पहाते का?असा सवाल सर्व पालीकर जनता विचारत आहे.