अलिबाग
वयाच्या 13 वर्षापासून ते अगदी 65 वर्षापर्यंतच्या वाचकांच्या अभिवाचनामुळे अलिबागकराना एका आगळ्या वेगळ्या कार्यकमाच्या आयोजनातून अभिवाचन मेजवानीचा आस्वाद घेता आला. निमित्त होते अभिवाचन आनंद आणि आभा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने पीएनपी नाटयगृहात आयोजित करण्यात आलेल्या एकल व सांघिक अभिवाचन स्पर्धेचे. या स्पर्धेची संकल्पना श्रद्धा पोखरणकर यांची होती. स्पर्धेच्या नियोजनात त्यांना हिमालय चोरघे, आनंद पाटील, अश्रिता बारसे, प्रथमेश पाटील, अक्षता कुळकर्णी गायकवाड, मनीष अनसुरकर यांनी मदत केली. स्पर्धेच्या पाठीशी आभा प्रकाशनाच्या शारदा धुळप भक्कमपणे उभ्या होत्या.
या स्पर्धेचा शेवट एक आगळ्या अभिवाचनाने झाला. स्वप्नील फडके यांनी मारुती चितमपल्ली यांच्या रानभुल या त्यांच्या वनकथा संग्रहातून अरणी ही कथा सादर केली. या अभिवाचनातुन तसेच झालेल्या उत्तम स्पर्धेतून वाचन आणि अभिनय यांच्या मधली पायरी म्हणजे अभिवाचन याचा सुखद अनुभव अलिबागकरांना घेता आला. अलिबाग तालुका तसेच पुणे येथील अगदी 13 वर्षांपासून ते 65 वर्षांपर्यंत उत्साही स्पर्धक लाभले होते. एकल आणि सांघिक अश्या दोन विभागात ही स्पर्धा झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कुरूळ येथील सुएसोसंचललित सृजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील उपस्थित राहिल्या. ज्येष्ठ रंगकर्मी सागर नार्वेकर, सं. मं. हायस्कूल, प्राथमिक विभाग नागांव  शाळेच्या मुख्याध्यापिका भावेश्री वाळंज, आणि व्यासायिक अभिवाचक स्वप्नील फडके यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे, अभिवाचन स्पर्धा 2020 निकाल एकल विभाग प्रथम आकाश थिटे, द्वितीय वसुंधरा पोखरणकर, तृतीय मंगला राजे, उत्तेजनार्थ अवंती वर्तक, उत्तेजनार्थ प्रांजली जाधव, सांघिक विभाग प्रथम क्रमांक अ‍ॅडिक्टेड थिएटर, खास वाचक ऋतुजा सरनाईक, उत्तेजनार्थ अनंत थिएटर, उत्तेजनार्थ वाचू आनंदे,