पनवेल :
बँक ऑफ महाराष्ट्र नवी मुंबई झोनने ओरायन मॉल पनवेल येथे नुकतेच ऋण एक्सपोचे यशस्वी आयोजन केले. या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रधान कार्यालय पुण्याचे उप महाप्रबंधक, सुभाष सिंह, नवी मुंबई झोनचे झोनल मॅनेजर, अनिल दत्त राजे, प्रमुख अतिथी ओरायन मॉलचे संस्थापक मंगेश परुळेकर व बँकेच्या सहाय्यक महाप्रबंधक सौ. विद्या कुलकर्णी उपस्थित होते. या प्रसंगी मंगेश परुळेकर म्हणाले की, ते बँक ऑफ महाराष्ट्राचे 40 वर्षा पासूनचे ग्राहक आहेत. त्यांच्या भरभराटी मध्ये बँकेचा खूप मोठा वाटा आहे. बँकेने एक्सपोचे यशस्वी आयोजन हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. बँक अधिकाधिक ग्राहकांना पर्यंत पोहचत आहे. त्यांनी बँकेच्या भरभराटी साठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बँकेचे उप महाप्रबंधक, सुभाष सिंह म्हणाले की, बँकेचे भारतभर चांगले नेटवर्क आहे. बँकेचा व्यवसाय हा रु.2,32,000 च्या वर आहे. बँक गेल्या दोन तिमाही पासून नफ्यात आहे. बँकेचा ग्राहक बेस हा चांगला आहे बँकेने 5000 करोड ऋण वाटपाचे लक्ष्य ठेवले असून ते लक्ष्य गाठण्याचा बँकेचा विश्‍वास आहे. या प्रसंगी बँकेचे झोनल मॅनेजर, अनिलदत्त राजे म्हणाले की, बँक ऑफ महाराष्ट्र ही ग्राहकांना अश्या कर्यक्रमातून जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. 2017 नंतर बँकेची भरीव कामगिरी राहिलेली आहे. बँकेची भरीव कामगिरी हा ग्राहकांचा सन्मान आहे. या प्रसंगी बँकेच्या सहाय्यक महाप्रबंधक विद्या कुलकर्णी यांनी एम.एस एम ई चे महत्व व ग्राहकांच्या ऋण च्या विविध गरजा समजून बँकेने अश्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच बँकेच्या विविध ऋण योजनांची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी उपस्थित ग्राहक वर्ग गायकवाड, प्रा मढवी, दिनेश जगताप, दिनेश हांडे, आकाश शाह, रमेश मोरे, गजेंद्र पाटील, प्रभाकर वाघमारे, वीरेन गोहेल व प्रकाश जावरे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी बँकेने तात्काळ नकुल देशपांडे, वाघमारे, गायकवाड, दिनेश जगताप, दिनेश हांडे, रमेश मोरे, गजेंद्र पाटील, प्रभाकर वाघमारे, वीरेन गोहेल, सुभाष जाधव, प्रकाश जावरे व आकाश शाह याना ऋण मजुरी पत्र दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्र संचालन व आभार प्रदर्शन अरविंद मोरे यांनी केले. कार्यक्रमास विविध शाखांचे शाखाप्रबंधक दिनेश परमार, दत्तात्रय कावेरी, श्रीमती अनुजा, निधी शर्मा, गीता वर्दम, चंदन कुमार, वाघमारे, राजेश कुमार, विजयकुमार पाटील विष्णू कांबळे, रजनीश जयस्वाल, पटनाईक, पुनीत व मोठ्या संख्येने ग्राहक वर्ग उपस्थित होता.