पनवेल :
पनवेल महानगरपालिकेचे धडाकेबाज विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने प. म. पा. हद्दीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. वाढदिवसाच्या भपकेबाज सेलिब्रेशन पासून चार हात दूर राहत आपल्या जन्मदिनी गरजवंतांना आधार देणे हि शेतकरी कामगार पक्षाची संस्कृती. या संस्कृतीची जपणूक करण्यासाठी शेकापचा प्रत्येक कार्यकर्ता झटत असतो. यथाशक्ती योगदान देत आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून लोकाभिमुख उपक्रमांतून जन्मदिन साजरे केले जातात. प्रीतम म्हात्रे यांनी हीच शिकवण पुरेपूर जपली. यावेळी आपली भावना प्रकट करताना प्रितम म्हात्रे म्हणाले कि माझ्याप्रती स्नेह असणाऱ्या कित्येक कार्यकर्त्यांनी माझ्या जन्मदिनाच्या औचित्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले. माझ्या जन्मदिनी अनेक गरजवंतांना त्याचा लाभ मिळाला याचे मला समाधान आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजता जे.एम्. म्हात्रे चॅरिटेबल संस्था व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी संस्था यांच्या वतीने अलविदा डायबेटीस या शिबिराचे आयोजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पनवेल च्या व्ही के हायस्कुल मध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मेडिटेशन व योगसाधनेद्वारा डीयबीटीज कसा दूर करू शकतो याचे मार्गदर्शन डॉ. कीर्ती समुद्र व डॉ. शुभदा निल यांनी उपस्थितांना केले.या शिबिराला प्रचंड प्रतिसाद लाभला. प्रीतम म्हात्रे यांच्या ३८ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने घोट येथे ३८ वृक्षांचे रोपण करण्यात आले. नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राजिप शाळेचे मुख्याध्यापक संदेश कुमार पाटील, पिल्ले कॉलेज चे प्रा. शादाब रिझवी, गोरखनाथ पाटील, वैभव पाटील, अक्षय पाटील व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. शेकाप युवानेते बबन विश्वकर्मा यांच्या वतीने नवीन पनवेलच्या शेकाप कार्यलयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ विजय कुमार यांचे मार्गदर्शनानुसार शिबिरार्थींना विनामूल्य तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. बबन विश्वकर्मा यांच्या पुढाकाराने खांदा कॉलनी मधील जनसेवा आश्रमातील लोकांना प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत अमोल रणदिवे, संजय कांबळे, समिर शेख, जुनेद अन्सारी, फराड, राहुल लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. दिपक कुदळे यांच्या वतीने नवीन पनवेल येथे दीपक क्लिनीक लॅबोरेटरीजच्या वतीने विनामूल्य थायरॉईडच्या तपासणीचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अनेक लाभार्थींनी या शिबिराचा लाभ घेतला. प्रीतम म्हात्रे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ग्रामीण भारत डिजिटल योजनेच्या अंतर्गत मोफत संगणक प्रशिक्षण देण्याच्या अभियानाला प्रारंभ करण्यात आल्याचे ट्रस्टच्या वतीने मंगेश अपराज व कमलेश जाधव यांनी सांगितले.