कोकण भवन येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरु

21
243

नवीमुंबई : कोकण विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे उद्घाटन आज दि.20 जानेवारी 2020 रोजी मा.उपायुक्त (महसूल ) श्री.सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते झाले. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्हयातील जनतेला मुख्यमंत्री सचिवालयात करावयाचे अर्ज, निवेदने, तक्रारी या कक्षात स्विकारल्या जाणार आहेत. कोकणभवन मुख्यमंत्री सचिवालयाने यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार केले असून प्राप्त अर्ज/निवेदने तत्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्याची व्यवस्था आहे. मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून विभागीय मुख्यमंत्री कक्ष स्थापन करणारे कोकण विभाग पहिले ठरले आहे. कार्यालयीन कामकाजाच्या वेळात रुम नं.117, पहिला मजला, कोकण भवन, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई येथे अर्ज स्विकारले जातील.
कार्यक्रमास उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे, उपायुक्त (पुरवठा) श्री.शिवाजी कादबाने, उपायुक्त (पुनर्वसन) श्री.अरुण अभंग, उपायुक्त (आस्थापना) श्रीमती चौरशी माने तसेच कोकण भवन येथील अधिकारी/कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

21 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here