जेएनपीटी बंदरातील महत्वाच्या दोन विश्वस्त पदासाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पार पाडली. या दोन विश्वस्त पदाच्या जागांसाठी बंदरातील पाच कामगार संघटनी अधिकृतपणे सहभाग घेतला होता. यावेळी कामगार नेते दिनेश पाटील यांच्या युनियनला ५३४ मते पडल्याने ते विश्वस्त पदाच्या निवडणूकीत विजयी झाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकाची मते कामगार नेते भुषण पाटील यांच्या युनियनला २८३ पडल्याने ते विश्वस्त पदाच्या निवडणूकीत विजयी झाले आहेत. यावेळी कामगार वर्गाने एकच जल्लोष करुन विजयी झालेल्या नवनिर्वाचित कामगार विश्वस्ताचे अभिनंदन केले. जागतिक किर्तीच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जेएनपीटी बंदरात दरदिवशी करोडोंची उलाढाल चालते. अशा महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रकल्पग्रस्तानी आपल्या शेतजमिनी अल्प किंमतीत संपादित करून दिल्या आहेत. मात्र असे असतानाही आज या बंदर परिसरातील प्रकल्पग्रस्त तरुण, वारसदार नोकरी पासून व नागरी सुविधा पासून वंचित राहीले आहेत. त्यामूळे प्रकल्पग्रस्तांना, बंदरातील कामगारांना त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका ही कामगार वर्गातून निवडून आलेले विश्वस्त पदाचे पदाधिकारी हे बंदरातील बोर्ड कमिटीच्या बैठकीच्या माध्यमातून बजावतात असतात.