पनवेल : पनवेल परिसरात बेकायदेशीरपणे बांगलादेशी, पाकिस्तानी तसेच नायजेरियन नागरिकांचे वाढते प्रमाण स्थानिक धोकादायक ठरू लागले असून भविष्यात होणार धोका टाळण्यासाठी या घुसखोरांना वेळीच हाकला असे साकडे पनवेल शहर मनसेचे अध्यक्ष शीतल सिलकर यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त यांच्याकडे घातले  आहे.

 देशाला सतावणारी मोठी समस्या म्हणजे पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची आहे. पनवेल परिसरात देखील ही समस्या वाढत चालली आहे. पनवेल मध्ये विविध झोपडपट्ट्या, गावातील चाळींमध्ये घुसखोरांची वास्तव्य वाढले आहे. काही दिवसापूर्वी चिखले येथून पोलिसांनी बांगला देशी नागरिकाला अटक केली होती . पोलिसांना त्याच्याकडे रेशनकार्ड , लायसन्स, आधार कार्ड , वय व अधिवास दाखल , स्थानिक वास्तव्याचा दाखला , शाळा सोडल्याचा दाखला , मतदान ओळख  पत्र आदी कागदपत्र आढळून आली . सामान्य माणसाला हि सर्व कागदपत्रे काढताना शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात . मात्र बांगलादेशातून घुसून पनवेलमध्ये मात्र सहज हि कागदपत्रे कशी मिळू शकतात . बांगलादेशातील मूळ नाव बदलून येथे स्थानिक नावाने तो याठिकाणी राहत होता असे समजते . देशातील नागरिकांकडे जेवढी कागदपत्रे इतक्या तत्परतेने भेटणे मुश्किल असते ती कागदपत्रे या बांगलादेशी नागरिकाकडे उपलब्ध होती. याबाबत मनसेने संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील केली होती. पनवेल शहर आणि परिसरात वाढत चाललेले घुसखोरांचे वास्तव्य बहुतकरून नवीन इमारतीवर मजूर काम करणे, लेडीज बारमध्ये महिला आणि वेटरचे काम करणे अशा ठिकाणी असते. अशा वेळी त्यांची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. तालुक्यातील बऱ्याचशा गावांमध्ये चाळी  बांधून भाडे तत्वावर देखील त्यांचे वास्तव्य आहे त्यामुळे भाडे करार करताना त्यासाठी  देखील चौकशी व्हावी तसेच ज्यांचे भाडे करार केले नसतील त्यांना भाडे करार करण्यास भाग पाडावे जेणेकरून वास्तव समोर येईल. पनवेल शहराच्या खाडी परिसरात अनधिकृत बांधकाम करून झोपडपट्टी आणि चाळींमध्ये घुसखोर राहत असल्याचे समजते . नवीन बांधकामांच्या ठिकाणी देखील मजूर म्हणून काम करत आहेत त्यामुळे त्यांची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी छापा सत्र सुरु करावे आणि संभाव्य धोका टाळावा अशी मागणी मनसेचे पनवेल शहर अध्यक्ष शीतल सिलकर यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त यांच्याकडे केली आहे याबाबत आयुक्तांनी बांगलादेशी घुसखोरांना जी भारताची कागदपत्रे पुरवण्यास मदत करत असतील अशांवर कारवाई होणे महत्वाचे आहे असे सांगून याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल असे सांगितले .