पेण :
    मुंबई-गोवा महामार्गावर पेण नजीक पुन्हा एकदा अपघात झाला असून या अपघातात गाडी पुलावरून 15 फुट खाली जाऊन  पडली. या अपघातात 3 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की गुरुवारी रात्री टाटा नेक्सन गाडी क्रमांक MH 05 – 5576 या गाडीने कल्याण वरून श्रीवर्धन येथे निघालेले राजेश शशिकांत मोरे वय 26, संध्या नथुराम पाटील वय 19 व प्रीती दत्तू कडवे वय 23 यांच्या गाडीला रात्री 1:30 च्या सुमारास पेण येथील हॉटेल झी गार्डन नजीक आले असता जोरदार अपघात होऊन सदर गाडी पुलावरून 15 फुट खाली कोसळली केवळ दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून तिघांचे प्राण वाचले परंतु हे 3 जण जखमी झाले असून त्यांच्यावर पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना अधिक उपचाराकरता कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.