पनवेलसह खारघर, तळोजा, कळंबोली आणि कामोठे येथील दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत रिक्षा सेवा उपलब्ध

0
153

पनवेल : वार्ताहर
              मार्च महिन्यामध्ये येऊ घातलेल्या दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणींना तोंड देताना कसरत करावी लागू नये, यासाठी पनवेलसह खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली परिसरातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षा सेवेचे आयोजन एमआयएमचे विद्यार्थी संघटनेचे कोकण निरीक्षक हाजी शाहनवाज खान यांनी केले आहे. तसेच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी निर्माण झाल्यास त्याठिकाणी धाव घेण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. 
              यावेळी परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन देत त्यांनी अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांनी हाजी शाहनवाज खान यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना खान यांनी सांगितले की, दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील मोठे दडपण असते, अशात काही वेळा त्यांच्या हॉल तिकीट पासून अन्य सुविधा मिळविण्यात अडचणी निर्माण होतात. मात्र शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणीबाबत आम्ही वाटेल तेव्हा वाटेल तिथे जाऊन मदत करू असे आश्वासन एमआयएमचे विद्यार्थी संघटनेचे हाजी शाहनवाज खान यांनी यावेळी केले. तसेच त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी 9987573552 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
            बऱ्याच वेळा गोरगरीब विद्यार्थ्यांना बसने शाळेत यावे लागते, मात्र परीक्षेच्या वेळी बस वाहने उशिराने धावत असतील तर मात्र विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी आपला अनमोल वेळ वाया घालवावा लागत असतो. त्यामुळे एमआयएमच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षासेवेचे आयोजनही यावेळी करण्यात आले असल्याचे खान यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here