लोकनेते रामशेठ ठाकुर यांचे घेतले आशीर्वाद

पनवेल /प्रतिनिधी
चांगु काना ठाकूर विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या ओलीन राज एन डी याने रशियामधून एम. बी. बी. एस. ची डिग्री घेऊन डॉक्टर झाला आहे. लोकनेते रामशेठ ठेऊन यांनी आर्थिक भरीव मदत केल्यानेच माझा मुलगा डॉक्टर झाला असल्याचे ओलीन च्या वडिलांनी या वेळी सांगितले. आर्थिक परिस्थिती नव्हती पण मुलाला डॉक्टर बनवायचे होते, मी मुलाच्या शिक्षणाकरिता रामशेठ ठाकूर साहेबांकडे जाऊन भेटलो साहेबांनी मागे पुढे न पाहता शिक्षणाकरिता भरीव मदत केल्याचे ओलीन च्या वडिलांनी सांगितले, ओलीन ने मेडिकल कॉउंसिल ऑफ इंडिया ची हि परीक्षा उत्तीर्ण केली आहे. माझ्या मुलाच्या यशात रामशेठ ठाकूर साहेबाचा मोठा वाटा असल्याचे ओलीन राज च्या वडिलांनी सांगितले.