माथेरान मध्ये सुसज्ज पार्किंग व्यवस्थेमुळे पर्यटकांमध्ये समाधान

0
174

माथेरान मधील दस्तुरी नाका येथे सध्या पार्किंगच्या सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू असून वाहनांसाठी ऐसपैस जागा उपलब्ध होत असल्याने पर्यटकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.वनखात्याच्या अखत्यारीत असणाऱ्या जवळपास वीस एकरांच्या या जागेवर एमएमआरडीए च्या माध्यमातून ही कामे एमएमआरडीए चे कार्यकारी अभियंता अरविंद ढाबे यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदार नितीन लाधानी यांच्या देखरेखीखाली सहायक दिपसिंग देवरा आणि प्रशांत चांदगुडे ह्या मंडळीने वेगाने कामे सुरू केली आहेत. या संपूर्ण भागाला जांभ्या दगडाच्या संरक्षण भिंती त्याचप्रमाणे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी इथे गटार लाईन टाकण्यात आल्या आहेत. अंतर्गत पार्किंग ठिकाणी जादा क्षमतेची वाहने सुध्दा वेळप्रसंगी प्रवेश करतात त्यासाठी विविध ठिकाणी सिमेंट कोंक्रेटचे लोखंडी अँगल मध्ये स्लॅब टाकण्यात आले आहेत. संपूर्ण पार्किंग मध्ये क्ले ब्लॉक बसविण्यात आल्यामुळे मातीची त्याचप्रमाणे रस्त्याची धूप थांबणार आहे. वनराईला कुठल्याही प्रकारचा धक्का अथवा हानी न पोहोचवता प्रत्येक झाडाभोवती जांभ्या दगडात संरक्षण कठडे उभारून त्यामध्ये विविध रंगीबेरंगी फुलांची लागवड करण्यात येत आहे त्यामुळे हा एकंदरीत परिसर स्वच्छ आणि सुंदर राखण्यासाठी वनखाते त्याचप्रमाणे नगरपरिषद यांची महत्वाची भूमिका असणार आहे. कारण वनखाते आणि नगरपरिषद येणाऱ्या प्रत्येक वाहन धारकाकडून वाहन प्रवेश कर आकारणी घेत आहेत. वनखात्याच्या कमानी पासून सभोवताली सर्व परिसराला संरक्षण कठडे उभारण्यात आले आहेत. पार्किंगच्या ऐसपैस सुविधेमुळे इथे पर्यटकांच्या खाजगी वाहनांची संख्या नक्कीच वाढणार असून या माध्यमातून वनखाते आणि नगरपरिषद यांना कर रूपाने भरीव उत्पन्न प्राप्त होणार आहे. पर्यटकांच्या वाढीमुळे सर्वसामान्य लोकांना, श्रमिकांना, हमाल, रुम एजंट,हातरीक्षा चालक, घोडेवाल्याना आगामी काळात चांगल्या प्रकारे रोजगार निर्माण होणार आहे.त्यातच या पार्किंग मधील प्लॉट नंबर ९३ हा नगरपरिषदेच्या अखत्यारीत आल्यास जवळपास पाचशे पेक्षाही अधिक गाड्यांची सोय इथे निर्माण होऊ शकते. हा प्लॉट ताब्यात येण्यासाठी विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत तसेच अन्य पक्षाचे माजी लोकप्रतिनिधी सुध्दा संबंधीत अधिकारी वर्गाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

मागील वर्षी सुट्ट्यांच्या हंगामात भरपूर पर्यटक दस्तुरी नाक्यावर आले होते त्यावेळेस खाजगी वाहनांसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता.यासाठी आम्ही जुंमा पट्टी येथे जवळपास दीडशेहून अधिक खाजगी वाहनांची पार्किंगची सोय केल्यामुळे पर्यटकांना माथेरान पहावयास मिळाले होते अन्यथा हेच पर्यटक माघारी जाणार होते.त्यावेळेस सर्वांना उत्तम प्रकारे व्यवसाय प्राप्त झाला होता. परंतु आता एमएमआरडीए च्या माध्यमातून सुरू असणाऱ्या पार्किंगच्या या महत्वाकांक्षी कामांमुळे खाजगी वाहनांची संख्या नक्कीच वाढून इथला पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होईल. प्रसाद सावंत – गटनेते तथा बांधकाम सभापती माथेरान नगरपरिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here