उरण : नवीमुंबई प्रकल्पबाधित 95 गावांतील व नैना प्रकल्प,विरार – अलिबाग कॉरिडोर, नवीमुंबई सेझ,नवीमुंबई विमानतळ, एम.आय.डी. सी.व इतर प्रकल्पांमुळे बाधित रायगड व ठाणे जिल्ह्यातील भूमीपुत्रांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात 17 मार्च 2020 पनवेल ते विधानभवन मुंबई लाँगमार्च करण्याचा निर्धार नवीमुंबई 95 गाव व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केला आहे.
राज्य सरकाने 1970 पासून सिडको विविध प्राधिकारणांच्या माध्यमातून रायगड व ठाणे जिल्ह्यातील सुमारे 95 गावांतील शेतजमीनी नवीमुंबई व इतर प्रकल्पांसाठी संपादित केली असून,येथील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन संपुष्टात आल्याने रायगड व ठाणे या दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी व बारा बलुतेदार असलेला भूमिपुत्र उध्वस्त झाला आहे.
तसेच तत्कालीन राज्य शासनाच्या उदासीन धोरणांमुळे शेतकऱ्यांचे तसेच मच्छिमार व बारा बलुतेदारांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. या संदर्भात नवीमुंबई 95 गाव व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने अनेक वेळा विविध प्राधिकारणांच्या उच्चस्थरिय प्रशासकीय अधिकाऱ्यांसामावेत या बाधित शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही प्रशासनाच्या लालफितीत अडकलेल्या कारभारामुळे संबंधित प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे बनले आहेत. त्यामुळे नवीमुंबई व इतर प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून,त्यांच्या मागण्यांचा अंतिम तोडगा काढण्यासाठी 17 मार्च 2020 रोजी सिडकोच्या 50 व्यवर्धापन दिनी सिडको महामंडळ बरखास्त करा व शेतकाऱ्यांना सिडकोच्या जावातून मुक्ती द्या.या प्रमुख मागणीसाठी व त्यांच्या न्यायहक्कांसाठी पनवेल ते विधानसभा मुंबई असा 25 ते 30 हजार प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा महामोर्चा विधानसभेवर धडकणार आहे.या मोर्च्यामध्ये अनेक पुरुष,महिला व युवक भूमिपुत्रांचा समावेश असणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा,मच्छिमार व बलुतेदारांचा सिडकोच्या व शासनातील अधिकाऱ्यांविषयीचा असलेला असंतोष विचारात घेऊन सर्व प्रकल्पबाधित भूमिपुत्रांचे गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असलेले सर्व प्रश्न तातडीने कालमर्यादित सोडविण्याबाबत निर्णय घ्यावा. अशा आशयाचे निवेदन राज्य शासनाला 20 फेब्रुवारी 2020 रोजी नवीमुंबई 95 गाव व इतर प्रकल्पग्रस समितीच्या वतीने देण्यात आले आले असल्याचे समितीचे अध्यक्ष ऍड.सुरेश ठाकूर व सचिव सुधाकर पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here