पनवेल : महिला दिन पनवेल मध्ये रविवारी अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ओरियन मॉलमध्ये यावेळी रॅम्पवाॅकचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 30 महिलांनी यावेळी या रॅम्पवाॅकमध्ये सहभाग घेतला. महिलांचे मनोबल वाढविण्यासाठी यावेळी काहे दिया परदेस या सिरीयल मधील गौरी (सायली संजीव ) व माझ्या नवऱ्याची बायको फेम शनाया (इशा केसकर ) या उपस्थित होत्या.
जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर दि. 7 ते 8 दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन महिलांसाठी करण्यात आले होते यामध्ये महिलांसाठी रॅम्पवाॅक व सौंदर्य वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सायली संजीव यांनी महिला दिनाच्या निमित्ताने सर्वाना शुभेच्छा देत आजच्या घडीला महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सायली संजीव यांनी सांगितले. आगामी एबी आणि सीडी या चित्रपट सर्वानी पाहण्याची आवाहन सायली संजीव यांनी केले. रॅम्पवाॅक मध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धक महिलांना यावेळी प्रशस्तिपत्रक आणि भेटवस्तू देण्यात आल्या.यावेळी उपस्थितीमध्ये ओरियन मॉलचे मालक मनन परुळेकर, मानसी परुळेकर, पूर्वी पोतदार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्र्यांना पाहण्यासाठी उपस्थित प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांचे मनोबल वाढविण्यासाठी व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी जल्लोष नाशिक ढोल ताशाचे वादन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here