पनवेल : सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानप्रवासद्वारे परदेशाहून भारतात आलेल्या प्रवाशांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग देशात आढळण्यास सुरूवात झाली आहे. पुण्यात काही रुग्ण आढळले आहेत. मात्र पनवेल महानगरपालिका हद्दीत सध्या तरी एकही कोरोना व्हायरसग्रस्त रुग्ण नसल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान पुण्यात काही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने पनवेल महानगरपालिकेमार्फत नागरिकांसाठी उपाययोजना करीत आहेत. कोरोनाग्रस्त देशामधून मागील काही दिवसात पनवेल महानगरपालिका क्षेत्रात एकूण 14 प्रवासी भारतीय नागरिक दाखल झाले असून त्यांची नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांद्वारा दैनंदिन तपासणी कण्यात येत आहे. यापैकी 4 नागरिक पुन्हा परदेशी (हाँगकाँग) परत गेले आहेत. वरील प्रवाशांना महानगरपालिकेतून दररोज तीन वेळा फोन करण्याचे निर्देश देण्यात आले आाहेत. परदेशी वारी करून आलेल्या नागरिकांना काही लक्षणे आढळल्यास त्यांच्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कामोठे या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वरील केंद्रात रुग्णास काही लक्षणे आढळल्यास त्यांच्यासाठी एम.जी.एम. हॉस्पिटल, कळंबोली येथे 39 बेडचा अत्याधुनिक आयसोलेशन कक्ष सुरू करण्यात आला आहे. 39 पैकी 09 बेड हे व्हेंटीलेटरसह क्रिटीकल केअरसाठी असतील. सामान्य नागरिकांना याबाबत मदत करण्यासाठी महानगरपालिकेत कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.पद्मिनी येलवे (8369375615) यांची नोड अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी गर्दी टाळण्यााच्या उपाययोजनांचा भाग म्हणून महानगरपालिकेच्या नाट्यगृहातील सर्व कार्यक्रम दि.31/03/2020 पर्यंत रद्द करण्यात आले आाहेत. यास अनुसरुन शहरातील सर्व मंगल कार्यालये, सांस्कृतिक व बहुउद्देशिय सभागृहे या ठिकाणी दि.31/03/2020 पर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन होणार नाही, याची जबाबदारी प्रभाग अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आाहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि.31/03/2020 पर्यंत सर्व शाळांना परिक्षेव्यतिरिक्त अन्य कोणताही कार्यक्रम आयोजित न करण्याचे निर्देश शिक्षण विभागामर्फत देण्यात येत आहेत.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक करण्यासाठी पोस्टर्स, स्टिकर्स, हस्तपत्रिका आणि होर्डींगच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. परदेशी वारी करून आलेल्या नागरिकांची माहिती महानगरपालिकेच्या कळविण्याबाबत सर्व गृह निर्माण सोसायट्यांचा आवाहन करण्यात येत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍याांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मास्कर, ग्लोव्हज, हॅण्ड सॅनिटायझर, लिक्विड सोप, प्रोटेक्टेड गाऊन व जिवाणू नाशके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता व कोणत्यााही अफवांना घाबरुन न जाता कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सर्दी, ताप, खोकला अशा आजारांसाठी त्वरित जवळच्या शासकीय व महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच सद्यस्थितीत परदेश पर्यटन टाळावे अशा सूचना महापालिकेमार्फत करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here