तीन पोर्ट हेल्थ ऑफिसरच्या परवागीनेच परदेशी जहाजांना बंदरात परवानगी

जहाजावरील एकही कर्मचाऱ्याला बंदरात उतरून दिले जात नाही

उरण : प्रतिनिधी – जीवन केणी

  कोरोनाबाबत तातडीच्या बैठकीत कोरोनाचा प्रार्दुर्भाव होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच बंदरात कोरोना दाखल होणार नाही याची संपूर्ण दक्षता पीएचओ घेत असल्याचेही  कपूर यांनी सांगितले. या बैठकीत प्रशासनाचे विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 सध्या भारत देशच नव्हे तर अवघे जग कोरोनाच्या भीतीने स्तंभित झाले आहे.देशभरातील बंदरे ही या कोरोनाच्या दहशतीत सापडली आहेत. याला देशातील नंबर वन जेएनपीटी बंदरही अपवाद नाही.या जेएनपीटी बंदरात जगभरातील देशातील मालवाहू जहाजे ये- जा करीत असतात. मात्र जगभरात कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढल्यानंतर जेएनपीटी प्रशासनाने ही खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. त्याची दखल घेऊन कोरोना विषाणू पसरल्यानंतर चीनमधुन येणाऱ्या  जहाजांना बंदरात जेएनपीटीने अनेक निर्बंध घातले आहेत. जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ ऑफिसरच्या ( पीएचओ ) परवानगीनंतरच जहाजांना बंदरात येण्याची परवानगी दिली जाते.

मात्र जहाजांवरील एकाही कर्मचाऱ्यांना बंदरात उतरुन दिले जात नाही.दिवसात किती जहाजे आली,किती रवाना झाली आणि जहाजांवरील किती कर्मचाऱ्यांची तपासणी केली त्याचा संपुर्ण तपशीलही केंद्रीय आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येतो अशी माहिती जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनाबाधीत देशांचा तपशील जेएनपीटी प्रशासनाकडे उपलब्ध आहे.अशा कोरोनाबाधीत देशातुन येणाऱ्या जहाजांना 15 दिवस बंदरात येण्यास परवानगी दिली जात नाही. 15 दिवसानंतर जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ ऑफिसरच्या ( पीएचओ ) परवानगीनंतरच जहाजांना बंदरात येण्याची परवानगी दिली जाते.

असेच कोरोनाबाधीत देशातुन अमोनिया रसायनाने भरलेल्या इराणच्या जहाजाला जेएनपीटीने बंदरात येण्यास परवानगी नाकारली आहे. जहाजावर तुर्की, भारतीयही कर्मचारी आहेत. खबरदारीची उपाययोजना म्हणून परवानगी नाकारण्यात आलेले इराणी जहाज मागील दहा- बारा दिवसांपासून समुद्रात नांगरुन ठेवण्यात आले असल्याची माहिती जेएनपीटी अधिकाऱ्यांनी दिली. 15 दिवसानंतर जेएनपीटीच्या तीन पोर्ट हेल्थ ऑफिसरच्या ( पीएचओ ) परवानगीनंतरच हे जहाज बंदरात लॅण्डींग करु शकेल अशी माहिती जेएनपीटीचे कॉन्झरवेटर कॅप्टन अमित कपूर यांनी दिली.बंदरात मालवाहू जहाजे शेड्युल प्रमाणेच दाखल होत आहेत. त्यामुळे आयात- निर्यात व्यापारात फारसा परिणाम झाला नसल्याचेही कॅप्टन अमित कपूर यांनी सांगितले. आज जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी कोरोनाबाबत तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रशासनाचे विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाचा प्रार्दुर्भाव होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बंदरात कोरोना दाखल होणार नाही याची संपूर्ण दक्षता पीएचओ घेत असल्याचेही  कपूर यांनी सांगितले. कोरोनामुळे बंदरात येणाऱ्या मालवाहू जहाजांची  संख्या कमी झाली आहे.पाच कंपनीच्या जहाजांनी शेड्युल ब्रेक केले असल्याची माहिती जेएनपीटीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.तर येथील सर्वात मोठे असलेल्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल बंदरावरही कोरोनाचा कोणताही परिणाम झाला नसल्याचा दावा बंदराचे एचआर अवधूत सावंत यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here