नवी दिल्ली : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. जगभरात हात-पाय फैलावलेल्या करोना व्हायरसचे वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता देशात त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ‘जनता कर्फ्यु’ची संकल्पना देशासमोर मांडलीय.
संपूर्ण जग सध्या मोठ्या संकटातून जात आहे. बऱ्याचदा एखादं प्राकृति संकट येतं तेव्हा ते काही देश किंवा राज्यापर्यंत सीमीत राहतं. परंतु, करोनाच्या संकटानं जगाला विळखा घालता संपूर्ण मानवजातीला संकटात टाकलंय, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ‘मी आज प्रत्येक देशवासियाकडे आणखीन एक समर्थन मागतोय. हे समर्थन असेल जनता कर्फ्युसाठी अर्थात जनतेनं जनतेसाठी लावलेला कर्फ्यु या कर्फ्युदरम्यान कोणत्याही नागरिकानं घराबाहेर पडू नये… २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यु’ आत्मसंयम, देशहितासाठी कर्तव्य पालनचा संकल्पतेचा एक प्रतिक असेल’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांना ‘जनता कर्फ्यु’चं पालन करण्याचं आवाहन केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here