पनवेल : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पनवेल वाहतूक शाखेतर्फे पनवेल शहर परिसरात विशेष मोहिम वपोनि मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार शिंदे व त्यांचे पथक स्वतः मास्क लावून तसेच सॅनिटायझर जवळ बाळगून रिक्षा तसेच काळ्या पिवळ्या टॅक्सीत नियमापेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक करणाऱ्या चालकाची गाडी थांबवून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्याला माहिती देऊन व त्याची जनजागृती करून त्या चालकांनीसुद्धा मास्क लावावेत. जवळ सॅनिटायझर बाळगावा, पैशांची देवाणघेवाण करताना हात स्वच्छ करूनच करावे, प्रवासी स्वतःच्या सिटच्या बाजूला बसू नये, प्रवाशांनासुद्धा मास्क किंवा रूमाल बांधण्याचा आग्रह करावा. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानक, एसटी स्टॅंड परिसर आदी ठिकाणी रूग्णांसदर्भात माहिती मिळाल्यास नजिकच्या पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहनसुद्धा वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिलकुमार शिंदे यांनी केले आहे.