माणगाव :
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य या विभागाद्वारे राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी योजना ही उपलब्ध करून देण्याची योजना शासनाच्या विचारधीन होती.त्याअनुषंगाने माणगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी निजामपूर रोड येथे बुधवार दि.१ एप्रिल २०२० रोजी शिव भोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले असता या केद्राचे माणगांवच्या तहसीलदार प्रियांका आयरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. या वेळेस माणगांव नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष दिलीप जाधव , आरोग्य सभापती रत्नाकर उभारे पत्रकार अनिल मोकाशी , गोतम जाधव ,पद्माकर उभारे इ . मान्यवर उपस्थित होते.
सदरचे शिवभोजन हे दहा रुपये थाळी याप्रमाणे देण्यात येणार होती. परंतु देशात आणि महाराष्ट्र पसरलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावा पाश्वभुमीवर गरजू व गरीबांना सदरची थाळी ही पाच रुपये दरामध्ये माणगाव येथे सौ . सुविधा सुधाकर उभारे यांच्याकडून साई सुविधा शिवभोजन थाळी केंद्राद्वारे सुरू करण्यात आले आहे. या भोजनालयात या थाळीमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात व एक वाटी वरण, असा समावेश करण्यात आला आहे. माणगाव मधील गरीब व गरजू लोकांची पाच रुपयामध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आल्यामूळे जनतेमधून यावेळी मोठे समाधान व्यक्त होत आहे.