यंदा ‘बिग बॉस’साठी सलमानला हवयं ‘एवढं’ मानधन

0
195

मुंबई छोट्या पडद्यावर वादांमुळे चर्चेत राहणारा ‘बिग बॉस’ या रिएलिटी शोचे ११ व पर्व लवकरच सुरू होणार आहे. हा शो सुरू होण्याआधीच सलमान खानच्या मानधनामुळे चर्चेत आला आहे. सलमान खानने बिग बॉसच्या आठ पर्वाचे सुत्रसंचालन केले आहे. बिग बॉसच्या ११ व्या पर्वासाठी सलमानने ११ कोटींचे मानधन मागितले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मानधनाच्या मुद्यावरुन सलमान मागील वर्षी हा शो सोडणार असल्याची चर्चा होती.

बिग बॉसच्या ११ व्या पर्वाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कलर्स वाहिनीचे सीईओ राज नायक यांना सलमानच्या मानधनाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सलमान खान एवढ्या स्वस्तात मिळत नसल्याचे सांगत प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले. बिग बॉसच्या १० पर्वांपैकी ८ पर्वात सलमान खानने सुत्रसंचालन केले आहे. सलमानच्या मते, बिग बॉस हा स्पर्धकांचा कस पाहणारा शो आहे. शोच्या सुरुवातीच्या दिवसात स्पर्धकांना बाद करणे चुकीचे असल्याचे सलमान म्हटले. या सुरुवातीच्या काळात स्पर्धकांची एकमेकांशी ओळख निर्माण होण्यास सुरुवात होते. जेव्हा स्पर्धक रुळतात तेव्हा त्यातील काहीजण शोच्या बाहेर पडलेले असतात. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना मनात येते असे सलमानने सांगितले.

बिग बॉसच्या ११व्या पर्वाला १ ऑक्टोबरपासून सुरू होते आहे. यंदा बिग बॉसच्या घरात हिना खान, शिल्पा शिंदे, विक्रांत सिंह राजपूत आणि गौरव गैरा सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. बिग बॉसमध्ये यंदा ‘ पडोसन चित्रपटाची’ ही थीम असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here