पोलीस ठाण्यासाठी आलेले पत्रे आणि ताडपत्रीचे पोलीसांनी गरजवंताना केले वाटप

0
59

उतेखोल / माणगांव : नुकतेच पोलीस अधीक्षक रायगड अलिबाग कार्यालय येथून १०० पत्रे आणि ५० ताडपत्री माणगांव पोलीस ठाणेस मिळाले होते. पोलीस स्टेशनचेही खुप नुकसान झाले होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागा तर्फे पोलीस स्टेशनची डागडूजी दूरुस्ती करण्यात आली असल्यामुळे यातील केवळ आठ पत्रेच ठेऊन पोलीस स्टेशनसाठी आलेले हे पत्रे व ताडपत्री गोरगरीब गरजवंताना देऊन खारीचा वाटा अशी मदत केली आहे. चक्रीवादळामुळे घरावरील छप्पर पत्र्यांचे मोठे नुकसान झालेल्या माणगांव तालुक्यातील काही मोजक्याच गरीब व गरजू नागरिकांना पोलीस ठाणेतुन त्यांचे वाटप करण्यात आले आहे. गरीब जनतेला आवश्यक वेळी थोडी मदत पोहचविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तरी अजूनही खूप नागरीकांना पत्रे, ताडपत्रीची गरज आहे. लोकांना घरावरचे छप्पर अत्यंत महत्वाचे आहे. घरात शिजवलेले अन्नाचे दोन घास खाताना, डोक्यावरुन पाणी ताटात गळू नये, एवढीच माफक अपेक्षा त्यामागची आहे. सर्वच गरजवंताना मदत होऊ शकली नाही. पत्रे वाटप होत असल्याचे समजताच अनेक गरजवंतानी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तरी वेगवेगळ्या सामाजिक संस्थानी, दानशूर व्यक्तींनी पुढे येवून गरजवंतांना अशीच आपआपल्या परिने मदत करण्याचे आवाहन माणगांव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रामदास इंगवले यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here