पनवेल तालुक्यात एकूण 112 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन परतले तर एकूण 8 जणांचा मृत्यू

पनवेेल : 4 जुलै पासून सुरु झालेल्या कडक लॉक डाऊन मुले रुग्णाची संख्या कमी येईल असे वाटत असतानाच कालचा दिवस सोडला तर कोणत्याही प्रकारे संख्या कमी झालेली दिसून येत नाही. आज तर महानगरपालिका हद्दीत 165 तर ग्रामीण मध्ये 57 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. एकूण 112 रुग्णांना पूर्णपणे बरे झाल्याने घरी सोडण्यात आले तर 8 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेेत्रात आज आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमध्ये एकूण 37, कामोठ्यातील 28, कळंबोलीतील 34, खारघरमधील 25, नवीन पनवेलमध्ये एकूण 14, नावडे येथील 6, घोटचाळ (तळोजा एमआयडीसी) येथील 5, खांदा कॉलनीतील 3, तळोजा वसाहतीमधील 3, पेठाली येथील 2, पेणधर येथील 2, तसेच टेंभोडे, धरणा गाव, तळोजे मजकूर, तोंडरे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये आज नोंद झालेल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये कोप्रोली येथील 13, उलवे येथील 5, आकुर्ली येथील 4, करंजाडे येथील 3, शिरढोण येथील 3, सुकापूर येथील 3, बामण डोंगरी येथील 2, दापोली येथील 2, केळवणे येथील 2, तसेच आदई, आपटे, आजिवली, बंबावीपाडा, भिंगार, भिंगारवाडी, पाटणोली, डेरीवली, देवद, दिघाटी, कोळवाडी, मोह, हरिग्राम, नांदगाव, पळस्पे, पालेबुद्रुक, शेडुंग, वडघर, विचुंबे, वाजे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान महापालिका क्षेत्रात पनवेल शिवाजी नगर झोपडपट्टी येेथील एका तर नवीन पनवेेल येथील एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच पनवेल ग्रामीणमध्ये पनवेल ग्रामीणमध्ये 6 मृत्यूंची नोंद झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार काही रूग्णांचा याआधी मृत्यू असून ’डेथ समरी रिपोर्ट’ आज प्राप्त झाल्याने नवीन रूग्णांमध्ये नोंद करण्यात आली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंमध्ये आदई, आपटे, पाटणोली, मोरावे, हरिग्राम आणि पालेबुद्रुक येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
आज पनवेल महापालिका क्षेेत्रात 92 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यामध्ये पनवेेल येेथील 29, नवीन पनवेेल 8, कळंबोली 18, कामोठे 13, खारघर 18, तळोजा येेथील 6 तर पनवेल ग्रामीणमध्ये उलवे येथील 4, विचुंबे येथील 4, उसर्ली येथील 3, आदई येथील 2, बामण डोंगरी येथील 2, चिंचवण येथील 2, करंजाडे येथील 2, तसेच पाटणोली, दिघाटी, कोळवाडी, कोन, कुंडेवहाळ, नेरे, साई, सावळे, शिरढोण, तारा, सुकापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाला पूर्णपणेे बरे झाल्यानेे त्यांना डिस्चार्ज देण्याात आला आहे.