शेतीच्या बांधावर निलेश रातवडकर यांचा सन्मानपूर्वक सत्कार

108
330

रायगड प्रेस क्लबची परंपरा अखंडीत

उतेखोल/माणगांव, रविंद्र कुवेसकर ) रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी माणगांव कुंभारवाडा येथील निलेश नामदेव रातवडकर शेतीनिष्ठ प्रगतीशिल पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याचा सन्मान शेतीच्या बांधावर जाऊन करण्याची सन्माननिय संस्थापक अध्यक्ष एस एम देशमुख यांचे मार्गदर्शनात रायगड प्रेसक्लबची प्रशंसनिय परंपरा अखंडीत ठेवत आज हा बहुमोल पुरस्कार माणगांव प्रेसक्लबचे सर्व सदस्यांचे उपस्थितीत प्रेसक्लबचे जेष्ठ सल्लागार अरुण पवार, रविंद्र कुवेसकर तसेच प्रेस क्लबचे अध्यक्ष उत्तम तांबे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. अत्यंत समाधानाची व आनंदाची भावना पुरस्कार स्विकारताना रातवडकर कुटुंबियांचे चेहऱ्यावर उमटली. या प्रसंगी प्रेसक्लबचे कार्याध्यक्ष – पदमाकर उभारे, माजी अध्यक्ष गौतम जाधव, खजिनदार -संतोष सुतार, सल्लागार – अनिल मोकाशी, सचिन वनारसे, वैभव सत्वे हे सर्व सन्माननिय सदस्य उपस्थितीत राहून कोरोना संकट असतानाही ही रायगड प्रेसक्लबची शेतीच्या बांधावर जाऊन सत्काराची परंपरा कायम ठेवली आहे. यावेळी निलेश रातवडकर यांची संपूर्ण भावकी, घरातील महिला आबालवृध्द सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त झाल्याने रातवडकर परिवाराने समाधान वाटल्याचे सांगितले. निलेश रातवडकर तसेच त्यांचे जेष्ठ बंधू यांनी शेती मधिल समस्यांवर मात करीत स्वतःचे कुटुंबाची वर्षभराची गरज भागवून उरलेले भात बाजारात विकता येते, परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देत पिक जास्त घेता येते परंतु हल्ली निसर्गाचा लहरीपणा व अनपेक्षित आपत्तीमुळे शेती करणे फारच कठीण झाले आहे असे सांगितले. तसेच उत्कृष्ट बि-बियाणे मिळत नाही, शासनाचे कृषी योजना, खते, शेतीविमा एक ना अनेक समस्या मोठ्या विश्वासाने पत्रकारांजवळ मांडल्या. कृषीविभागातून शेतकऱ्यांना जी माहीती मिळायला पाहीजे ती मिळत नाही आपल्या माध्यमातून ती मिळण्यासाठी पत्रकारांचे सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली यावेळी माणगांव प्रेसक्लबच्या वतिने जेष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना रायगड प्रेसक्लबचे माध्यमातून त्यांना या बाबत सहकार्य करण्याचा शब्द देऊन आपले म्हणने संस्थेच्या वरीष्ठां पर्यंत पोहचवू असे सांगून आश्वस्त केले.

108 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here