प्रभास आणि अनुष्काचा डिसेंबरमध्ये साखरपुडा?

177
656

नवी दिल्ली दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचं नातं नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतं. मात्र प्रभास-अनुष्का दोघेही याबाबत बोलण्यास नेहमीच टाळाटाळ करतात. या दोघांमधील कथित प्रेम प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.प्रभास आणि अनुष्का येत्या डिसेंबर महिन्यात साखरपुडा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या दोघांपैकी कुणीही अद्याप साखरपुड्यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला नाही.‘बाहुबली 2’ सिनेमाच्या प्रदर्शनानंतर प्रभास आणि अनुष्का यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या केवळ अफवा असल्याचे या दोघांकडूनही सांगण्यात आले आणि केवळ आमच्यात मैत्री असल्याचे स्पष्ट करण्यात आले.अनुष्का सध्या तिचं वजन कमी करण्यासाठी मेहनत घेत आहे. काहींचं म्हणणं असंय की, अनुष्का साखरपुड्यासाठी वजन कमी करतेय, तर काहींच्या मते, ‘भागमती’ या आगामी सिनेमासाठी ती वजन कमी करतेय.‘बाहुबली 2’च्या प्रदर्शनानंतर प्रभास त्याच्या आगामी ‘साहो’ सिनेमामध्ये व्यस्त आहे.प्रभास आणि अनुष्का यांची पहिली भेट 2009 मध्ये ‘बिल्ला’ सिनेमाच्या सेटवर झाली. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली. त्यानंतर ‘मिर्ची’, ‘बाहुबली’, ‘बाहुबली 2’ अशा अनेक सिनेमांमध्ये ही जोडी एकत्र दिसली.आता प्रभास आणि अनुष्काच्या साखरपुड्याची बातमी तरी खरी ठरते की हीसुद्धा अफवाच आहे, हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

177 COMMENTS

  1. Hi! This is my first visit to your blog! We are a collection of volunteers and starting a new project in a community in the same niche. Your blog provided us valuable information to work on. You have done a marvellous job!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here