सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मोरा ते भाऊचा धक्का जलवाहतूक सूरू

364
1015

जेेऐनपीटी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने उरणकरांसाठी अत्यंत महत्वाची असलेली मोरा ते भाऊचा धक्का ही प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात आली होती. तब्बल सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आत्ता पुन्हा एकदा ही प्रवासी जलवाहतूक (लाँच सेवा) गुरूवार दि३ पासून सूरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोरा ते मुंबई ही जलवाहतूक सेवा सुरू आहे. ट्राफिक जाम, खराब रस्ते आणि वेळेची बचत यामुळे उरण तालुक्यातील प्रामुख्याने उरण शहर, आणि उरण तालुक्यातील पश्चिम भागातील हजारो लोक मुंबईला जाण्यासाठी या जलवाहतूक सेवेचा वापर करतात. अनेक वर्षे ही सेवा अखंडीतपणे सूरू आहे. मात्र उरण तालुक्यातील वाहतूकीसाठी अतिशय महत्वाची असलेली ही जलप्रवास सेवा ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहीली आहे. सूरूवातीच्या काळात दिवसाला ६फेऱ्या पर्यंत ही सेवा मर्यादित ठेवण्यात आली आहे. यानंतर प्रवाशांची गरज ओळखून फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी प्रवाशाने मास्क लावणे अत्यावश्यक ठेवण्यात आले आहे. तसेच वेळोवेळी बसण्याची व्यवस्था सॅनिटायझरींग करण्याची काळजी लाँच चालकाने घ्यायची आहे. लाँचमध्ये गर्दी होवू नये यासाठी निम्मे प्रवाशांनाच प्रवेश देण्यात यावा अशा अटी ठेवण्यात आल्या असल्याची माहिती मेरीटाईम मंडळाचे निरिक्षक पी.बी. पवार यांनी दिली.

364 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here