राजेश बाष्टे – अलिबाग 
लॉकडाऊनच्या काळातील एकत्रित वीजबिले चालू महिन्यात सर्वसामान्य जनतेच्या हातात पडल्यानंतर रिडींग न घेता सरासरी एव्हरेज काढून अंदाजे परंतू भरमसाठ वीजबिले विजमंडळाने दिल्यामुळे अगोदरच ग्रासलेल्या व त्रासलेल्या मध्यमवर्गीय सर्वसामान्य जनतेमध्ये कमालीची नाराजी पसरल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५०० स्केअर फुटाच्या आतील निवासी संकुलांच्या घरमालकांना घरपट्टी माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्याचप्रमाणे त्याच धरतीवर शासनाने लॉकडाऊनच्या कालावधीतील किमान ५०० युनिट पर्यंतची वीजबिले माफ करण्यात यावी असे निवेदन नुकतेच शिवसेना रायगड  जिल्हा प्रमुख आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आदेशानुसार शिवसेना तालुका प्रमुख राजाभाई केणी व शिवसेना शिष्टमंडळ यांनी महावितरणाचे प्रभारी कार्यकारी अभियंता  अजित पिंगळे यांना दिले व लवकरात लवकर वीजबिले माफ करण्यात यावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा यावेळी त्यांनी आपल्या निवेदनात दिला. यावेळी शिवसेना आमदार महेंद्रशेठ दळवी हे कोरोना पॉजिटीव्ह असल्याने क्वारंटाईनमुळे प्रत्यक्ष निवेदन देताना हजर राहू शकले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊनाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानूसार शासनाला उत्स्फूर्त सहकार्य करण्याच्या दृष्टीनेच शासनाच्या आदेशानुसार लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केल्याने मालकवर्ग घरात बसला व पर्यायाने नोकरवर्ग देखील घरात बसल्याने तसेच अनेकांच्या नोक-या गेल्या व छोटे मोठे व्यवसाय बंद पडले व त्याचाच परिणाम असा की, उपजिविकेचे साधन सर्वस्वी बंद झाले व घरातील कर्त्या पुरुषाला सुद्धा घरात बसून रहावे लागले व पर्यायाने मुलाबाळांसह सर्व घरात राहिल्याने लाईटचा वापर जास्त प्रमाणात झाला असावा परंतू रायगडकरांवर ओढावलेल्या आपत्तीमुळे चक्रीवादळाने झालेले नुकसान व कोरोनामूळे बंद पडलेली उपजिविकेची साधनसामग्री यामुळे प्रत्येकावरच  उपासमारीची वेळ आली. महामारीचे हे संकट अजुनही कमी झालेले नाही, भितीचे सावट अजुनही तसेच कायम आहे त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या वाढतच आहे. त्यासाठी लॉकडाऊन उठला परंतू कोरोना संपला नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस कसाबसा यातून सावरत असतानाच अचानक आलेली भरमसाठ वीजबिले भरणे सुद्धा शक्य नाही व सर्वसाधरण लोकांना वीजमंडळ कार्यालयाकडून होत असलेला त्रास यामुळे सध्या बहुतांशी उपासमारीच्या खाईत असणा-या जनतेला वीजबिले भरणे शक्य होत नाही तरी शासनाने सर्व बाबी विचारात घेवुन लॉकडाऊन काळातील किमान ५०० युनिट पर्यंतची वीजविले माफ करण्यात यावी असे निवेदन आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आदेशानुसार तालुका प्रमुख राजाभाई केणी यांच्या हस्ते वीजमंडळ अधिक-यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना नेते दिपक रानवडे, संतोष निगडे, सुरेश म्हात्रे, शंकर गुरव, सतिश पाटील व प्रकाश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.