आगरदांडा : (गणेश चोडणेकर)
३जुन रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये मुरूड समुद्रकिनारी असलेल्या सर्व टपरी स्टाॅल्सवर नारळाचे झाड , वीजेचा खांब कोसळल्याने स्टाॅल्स पुर्णपणे जमीनदोस्त झाले आसुन तर काही टपरीचे वा-यांनी आपटुन प्रचंड नुकसान झाले आहे.वादळानंतर नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी नुकसानग्रस्त स्टाॅल्सची पंचनाम केले. आज त्या पंचनामाला १०० दिवस झाले तरी भरपाई मिळाली नाही.भरपाई न मिळाल्याने पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष- अरविंद गायकर यांनी १६ सष्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मुरूड तहसिलदार कार्यालया समोर अमरण उपोषण करणार असे लेखी निवेदन खासदार- सुनिलजी तटकरे , पालकमंत्री – आदिती तटकरे , आमदार – महेंद्रशेठ दळवी , पोलीस अधीक्षक – – अनिल पारस्कर , उपविभागीय अधिकारी अलिबाग- शारदा पोवार , मुरूड तहसिलदार – गमन गावित , मुरूड मुख्याधिकारी- अमित पंडीत , मुरूड पोलीस ठाणे- रंगराव पवार यांना देण्यात आले.
मुरूड नगरपरिषद हद्दीतील समुद्रकिनारी ४४अधिकृत स्टाॅल्स असुन स्टाॅलमालक नगरपरिषदेला वार्षिक ८०००रूपये भरत आसुन नगरपरिषेदेला दरवर्षी जवळजवळ ४लाखांचा महसुल मिळत आहे.नगरपरिषदेने स्टाॅल्स धारकांची करारपत्रे व इतर कागदपत्रे तहसिलदार कार्यालाकडे सुपुर्द केली आहेत.परंतु वादळ होवुन तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तरी एकाही स्टाॅल धारकांला नुकसान भरपाई मिळालेली नाही.मार्च महिना पासुन जो लाॅकडाऊन सुरू झाल्यापासुन स्टाॅल बंद आहेत.त्यात या वादळाने स्टाॅल्सचे नूकसान झाले आहे अशा परिस्थितीत स्टाॅल धारकांनी खायचे काय हा प्रश्न उभा राहिला आहे.त्याच्यावर अक्षरक्षा उपासमारीची वेळ आली आहे तरी येत्या १५सष्टेंबर२०२० पर्यत शासनाकडुन कोणतेही दखल न घेतल्यास येत्या १६ सष्टेंबर२०२० दुपारी १२ वाजता तहसिलदार कार्यालया जवळ अमरण उपोषणाला सुरवात करणार आसा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक स्टाॅलधारक संघटनेने अध्यक्ष- अरविंद गायकर यानी दिला आहे.
३जुन या दिवशी निसर्ग चक्री वादळ झाले त्यावेळी भेट देण्याकरिता स्थानिक आमदार , खासदार , पालकमंत्री आले आसता त्यावेळी सर्वानी सांगितले कि नुकसान भरपाई हि सरसकट देणार असुन कोणीही या भरपाई मधुन वंचित राहणार नाही. असे अश्वासन नुकसान ग्रस्ताना सांगण्यात आले. यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही असे असताना सुध्दा सी आर.झेड कायद्याचे नियम लावत माझ्या गरीब टपरी धारकांना निसर्ग चक्री वादळाची मदत दिली जात नाही.हे अत्यन्त खेद जनक असुन आम्हा गरीब लोकांवर अन्याय करणारी भुमीका प्रशासनाकडुन घेतली जात आहे.वास्तविक पहाता निसर्ग चक्री वादळाची मदत समुद्र किनारी राहणारे कोळीवाडे व अन्य घरांच्या नुकसानाला आपल्या प्रशासनाने आर्थिक मदत दिली आहे.मग गरीब टपरी धारकांना हा नियम का लावला जात आहे.नगरपराषदेला आम्ही कर भरतो तरीही माझ्या टपरी धारकांना निसर्ग चक्री वादळाची मदत मिळेत नसेल तर हा आमच्यावर अन्याय होत असल्याने या अन्याला शासनाला जागा करण्याकरिता १६ सष्टेंबरला उपोषण करणार असे रितसर निवेदनात करण्यात आले आहे.
याबाबत मुरूड तहसिलदार- गमन गावीत यांना विचारणा केली आसता त्यावेळी म्हणाले की सदर खोके -टपरी धारक हे समुद्रकिना-यापासुन सी.आर.झेडच्या क्षेत्रामधील आहेत.सदर हे निवेदन सी.आर.झेडच्या क्षेत्रामधील असल्यामुळे शासकीय मान्यता नसल्यामुळे सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे जिल्हाधिकारी- निधी चौधरी यांनी हा प्रस्ताव राज्यसरकार सचिवाकडे पाठविला आहे. या संदर्भातील पत्र व्यवहार सबंधित उपोषण कर्तेकडे देण्यात आले आहे.