पनवेल : न्हावा-शिवडी सेतू प्रकल्पामध्ये जे मच्छीमार बांधव बाधित होते त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बादली यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे १६५० मच्छिमार बांधवांना नुकसान भरपाईचा मोबदला मिळाला. एकत्रित २२ कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणुन वाटप करण्यात आले. त्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार उलट करताना न्हावा-शिवडी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते सुरेश पाटील, जयवंत देशमुख, विशाल कोळी, प्रमोद कोळी, नंदकुमार कोळी, संजीव कोळी आणि राजकिरण कोळी आदी उपस्थित होते त्याप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, उर्वरित कामकाजही आपण अजून जास्त गतीने आणि लवकरात लवकर पूर्ण करू, अशी ग्वाही दिली.