कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला मान्यवरांची मांदीयाळी!

277
971
नवी मुंबई : नवी मुंबई प्रेस क्लब आयोजित कोजागिरी पौर्णिमेचा सांस्कृतिक कार्यक्रम नवी मुंबईतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शासकीय क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मांदीयाळीत मोठÎा दिमाखात पार पडला.
नवी मुंबई ह्या 21व्या शतकातील शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत पत्रकारांनी देखील मागे राहू नये म्हणून नवी मुंबई प्रेस क्लबच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करुन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शासकीय क्षेत्रातील मंडळींना एकत्रित आणण्याचे प्रयत्न केले जातात. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने हे सुरांनो चंद्र व्हा या चंद्रावर आधारीत गीतांपासून ते बॉलीवुडपर्यंतच्या मराठी-हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथील विष्णुदास भावे नाटÎगृहात करण्यात आले होते.

या कार्यक्रमास आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलिस आयुक्त प्रशांत बुरडे, पोलिस उपायुक्त प्रविण पवार, राजेंद्र माने, तुषार दोषी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशन जावळे, किशोर तावडे, दिलीप गुट्टे, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, ज्येष्ठ पत्रकार अशोक जालनावाला, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड, डॉ. संजय पत्तीवार, नगरसेविका नेत्रा शिर्के, मीरा पाटील, महापालिकेचे लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, ईटीसीच्या संचालिका वर्षा भगत, एनएमएमटीचे महाव्यवस्थापक शिरीष आरदवाड, नगरसचिव चित्रा बाविस्कर आदिंसह शासकीय अधिकारी, सांस्कृतिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि पत्रकार वर्गाने उपस्थित राहून चंद्रगीतांच्या मैफलीचा आनंद लुटला.
या कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी केले  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष नारायण जाधव,  सचिव नंदकुमार ठाकूर, मछिंद्र पाटील, मनोज पाठक, विक्रम गायकवाड, संजय सुर्वे, भिमराव गांधले, स्वाती नाईक, वसंत चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली.

277 COMMENTS

  1. What i do not realize is actually how you’re not really much more well-liked than you might be now. You’re very intelligent. You realize therefore considerably relating to this subject, made me personally consider it from a lot of varied angles. Its like women and men aren’t fascinated unless it’s one thing to accomplish with Lady gaga! Your own stuffs great. Always maintain it up!

  2. You actually make it seem so easy with your presentation but I find this matter to be really something which I think I would never understand. It seems too complicated and very broad for me. I’m looking forward for your next post, I will try to get the hang of it!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here