नवीन पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील महिला लघुउद्योजकांसाठी गोखले हॉल पनवेल येथे १५, १६ व १७ जानेवारी तीन दिवसीय स्टॉल मोफत उपलब्ध करून भव्य व्यापारी- ग्राहक पेठेचे आयोजन केले आहे. कोविड काळामध्ये महिला आणि महिला बचत गटाच्या लघुउद्योगावर लॉक डाउन काळात परिणाम झाला. अशा महिलांसाठी आणि त्यांच्या लघु उद्योगाला चालना मिळून त्यांच्या जिद्दीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रितमदादा म्हात्रे अध्यक्ष असलेल्या जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या व्यापारी- ग्राहक पेठेची वेळ सकाळी १० ते रात्री ८ असणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री बाळाराम पाटील उपस्थित राहणार आहेत. या  व्यापारी- ग्राहक पेठेचे उदघाटक ममता प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अनुराधा ठोकळ (शेकाप महिला आघाडी प्रमुख), माधुरी गोसावी (अर्बन बँक संचालिका), डॉ. सौ सुरेखा मोहोकर (नगरसेविका पमपा), प्रीती जॉर्ज (नगरसेविका पमपा), सारीका भगत (नगरसेविका पमपा) उपस्थित राहणार आहेत. या आपल्या महिलांच्या वस्तूच्या खरेदी विक्री  व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी आपणही या भव्य व्यापारी ग्राहक पेठेला भेट देऊन मनसोक्त खरेदी करा असे आवाहन करण्यात आले आहे.